Thursday, April 25, 2024

/

किल्ला बद्रोद्दीन दरगाह – 7 एप्रिलपासून संदल आणि ऊर्स

 belgaum

Killa dargahबेळगाव शहरात अनेक दरगाह आहेत त्यातील सर्वात जुना किल्ला येथील हजरत शेख बद्रोद्दीन आरिफ चिस्ती (बद्रोद्दीन बाबा) दरगाह एक पवित्र आणि मानलेल स्थळ आहे. शहरातील मुस्लीम समाजाबरोबर हजारो हिंदू बांधवा देखील या ठिकाणी दर्शना साठी दररोज येत असतात.

अजमेर चे ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिस्ती यांचे शिष्य दिल्लीतील हजरत कुतुबुद्दीन बख्तियार आहेत कुतुबुद्दीन बख्तियार यांचे शिष्य बेळगाव किल्ला येथील हजरत शेख बद्रोद्दीन आरिफ चिस्ती होय त्यामुळे किल्ला दरगाह ला खूप मानाचं स्थान आहे. मानव धर्म च्या कल्याणासाठी बद्रोद्दीन बाबा बेळगाव ला आले होते त्यांनी किल्ला दरगाह येथे समाधी होऊन 790 वर्ष झाली आहेत.
किल्ला दर्ग्याची विशेषता म्हणजे कॅम्प येथील असदखान बाबा दर्ग्याचा संदल पहिला किल्ला बद्रोद्दीन बाबा ला चढवून नंतर कॅम्प दरगाह चढविला जातोय हा किल्ला दरगाह ला मान आहे गेल्या 400 वर्षा पासून ही परंपरा सुरु आहे
बाबा हजरत शेख बद्दरोद्दीन आरिफ यांचा 790 वा ऊर्स निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून
शुक्रवारी 7 एप्रिल रात्री कुराण पठण, शनिवार 8 एप्रिल संदल तर रविवारी 9 एप्रिल रोजी ऊर्स आयोजित केला दुपारी सार्वजनिक भोजन(महाप्रसाद) असून सोमवारी 10 एप्रिल रात्री कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचा लाभ घ्यावा असं आवाहन रफिक मुजावर यांनी केलं आहे
अधिक माहिती साठी
रफिक मुजावर
7090577865

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.