belgaum

किडनी स्टोनवरील उपचारासाठी ‘डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक’!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : किडनीचे आजार आणि मुतखड्याच्या असह्य त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बेळगावमधील ‘डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक’ हे हुकमी उत्तर ठरले आहे. गेल्या ३० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या क्लिनिकने कोणतीही शस्त्रक्रिया न करता केवळ विशेष होमिओपॅथिक औषधोपचारांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवीन आयुष्य दिले आहे.

बेळगावमधील आरपी रोड, टिळकवाडी येथे मुख्य शाखा असलेल्या या क्लिनिकचे संस्थापक डॉ. भूषण देसाई आणि डॉ. योगिता देसाई यांनी आपल्या विशेष उपचार पद्धतीतून वैद्यकीय क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सुरुवातीला ‘मुतगे’ या गावातून सुरू झालेल्या या रुग्णसेवेचा विस्तार आता देशभरात होत असून रुग्णांना त्यांच्या भागातच सर्व वैद्यकीय सेवा मिळाव्यात आणि त्यांना लांबचा प्रवास करावा लागू नये, हाच या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे.

या क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या चंदगड येथील रुग्ण सुरेखा सामंत सांगतात की, त्यांच्या उजव्या किडनीमध्ये ५५ मिमीचा मोठा खडा होता आणि डाव्या किडनीमध्येही खडे होते, मात्र डॉ. देसाई यांच्या औषधोपचारामुळे कोणतीही शस्त्रक्रिया न करता त्यांचे सर्व खडे पूर्णपणे निघून गेले असून त्यांना आता कोणताही त्रास नाही. तसेच दुसरे रुग्ण महादेव कुंदनद यांचे क्रिएटिनिन ७.५ पर्यंत वाढल्यामुळे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी त्यांना डायलिसिस करण्याचा सल्ला दिला होता, पण डॉ. देसाई यांच्याकडे उपचार सुरू केल्यावर अवघ्या एका महिन्यात त्यांचे क्रिएटिनिन ०.९ या सामान्य पातळीवर आले असून अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनीही हा रिझल्ट पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. यासोबतच प्रमिला वैद्य यांच्या आईचे क्रिएटिनिन वाढल्यामुळे जेवण जात नव्हते आणि प्रोटीन लॉस होत होता, पण येथे उपचार घेतल्यानंतर त्यांचा प्रोटीन लॉस थांबून क्रिएटिनिन नॉर्मल आले आहे आणि त्यांची प्रकृती आता उत्तम आहे.

 belgaum

केवळ स्थानिकच नव्हे तर गोवा, गुजरात आणि राजस्थानमधून येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी क्लिनिकने आपल्या शाखांचा विस्तार केला असून गोवा, विजापूर आणि मुधोळ येथील शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत, तर संकेश्वर येथे ९ जून रोजी नवीन शाखा सुरू झाली आहे. यापुढील विस्तारात इम्फाळ येथे ३० जुलै रोजी, मोरादाबाद येथे १ ऑगस्ट रोजी आणि कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट रोजी भव्य नवीन शाखांचे उद्घाटन होणार आहे.

या क्लिनिकमध्ये होमिओपॅथिक पद्धतीने ५ एमएम ते १५ एमएम आणि त्याहून मोठ्या आकाराचे स्टोन औषधांच्या मदतीने लघवीवाटे सहज बाहेर काढले जातात, तसेच किडनी फेल्युअर, नेफ्रोटिक सिंड्रोम, पायलोनेफ्रायटिस आणि युरेथ्रल स्ट्रक्चर यांसारख्या गंभीर आजारांवर यशस्वी उपचार केले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना किडनीच्या गंभीर समस्यांमुळे डायलिसिसची तात्काळ गरज भासणार असते, अशा रुग्णांचे डायलिसिस औषधांच्या मदतीने रोखण्यात या क्लिनिकला मोठे यश आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क आणि पत्ता: डॉ. देसाईज् किडनीस्टोन क्लिनिक, २ रा मजला, आरएनबी एमरल्ड, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, आरपीडी कॉर्नर, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव – ५९०००६.
मोबाईल नंबर: 8095025777, 9663224555, 9481214666
वेबसाईट: https://drdesaikidneystoneclinic.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.