बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (अपराध व संशोधन) तसेच मार्केट उपविभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव हिंडलगा ब्रीज हायवेवर दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एक बुलेरो वाहन अडवून चालकाला मारहाण करत रोख रक्कम व मोबाईल फोन बळजोरीने लुटणाऱ्या तीन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अटकेतील आरोपींमध्ये प्रकाश मनेश्वर कटाबळी (वय: १८ वर्षे, रा: संताजी गल्ली, कंगाळाळी बी.के., बेळगाव), अमित चंद्रगौडा पाटील (वय: २० वर्षे, रा: इंदू नगर, पाटील गल्ली, यमनापूर, बेळगाव)
आणि ओम गणेश तं. उमेश पुजारी (वय: २३ वर्षे, रा: संताजी गल्ली, कंगाळाळी बी.के., बेळगाव) यांचा समावेश असून, याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. २२७/२०२६, कलम ३०९(४) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून सुमारे ४१,०००/- रुपये किमतीचा विवो व्ही-७० एफ.ई. मोबाईल, गुन्ह्यासाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. केए-२२, ईजे-९३23) आणि आरोपींचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदर प्रकरणाच्या यशस्वी तपासात पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डकर, पीएसआय आनंद आडगोंड, पीएसआय श्रीशैल हुलगरे, पीएसआय उदय पाटील, पीएसआय जे.आय. देवडी तसेच पोलीस अंमलदार बी.एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, एम.जी. कुरेर, सी.आय. चिगरी, के.बी. गौराणी, जगन्नाथ भोसले, बी.एम. कल्लाप्पनवर, सी.जे. चिन्नप्पगोळ, महेश ओडेयर, मल्लिकार्जुन गाडवी यांनी प्रशंसनीय कामगिरी केली असून, त्यांच्या या कार्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.





