belgaum

राजे शहाजी महाराज समाधीस्थळ विकासावर सरनोबत-मुतालिक चर्चा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्रीराम सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केकेएमपी महिला अध्यक्षा तथा मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी होदगीरे येथील स्वराज्याचे मूळ पुरुष छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकासकामांबाबत सुदीर्घ चर्चा करण्यात येऊन बेळगावातील मराठा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्याचा मुतालिक यांनी गौरव केला.

बैठकीदरम्यान बेळगावमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून आणि केकेएमपी महिला अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत प्रमोद मुतालिक यांनी विशेष समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी डाॅ. सोनाली सरनोबत यांनी प्रमोद मुतालिक यांचा यथोचित सत्कार केला.

होदगीरे येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासाचे काम गेल्या कांही काळापासून रखडलेले आहे. बेळगावच्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन शासनाकडे या स्मारकाच्या सर्वांगीण विकासाची मागणी कांही दिवसांपूर्वी केली होती. याच पार्श्वभूमीवर, आगामी काळात मराठा समाजाच्या सहकार्याने छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासंदर्भात श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी आपल्या भेटीप्रसंगी केकेएमपी महिला अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्याशी चर्चा केली.

 belgaum

डॉ. सोनाली सरनोबत यांच्याशी झालेल्या बैठकीतील चर्चेनंतर बोलताना श्री. प्रमोद मुतालिक यांनी, “बेळगावमध्ये डॉ. सोनाली सरनोबत कर्नाटक क्षत्रिय मराठा समाज अतिशय कौतुकास्पद कार्य करत आहेत. छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास हा आपल्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेशी निगडित विषय आहे.

या कार्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सरकारकडे ठामपणे आणि ताकदीने मागणी मांडणार आहोत,” असे स्पष्ट केले. बैठकीस श्रीराम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाजाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.