सावधान … पुन्हा तीन कार जाळल्या

0
962
car burnt
 belgaum
बुधवारी पहाटे जाधवनगर भागात सात कार गाड्या अज्ञातानी भक्ष्य केलेली घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री पुन्हा तीन कार गाड्यांना अज्ञातानी जाळल्याची माहिती मिळाली आहे.
रात्री ८:४५ च्या सुमारास विजय नगर येथील वरदराज अपार्टमेंट च्या बाजूला निवृत्त शिक्षिका डिसोजा यांच्या घरा समोर थांबलेल्या आय-२० कारला आग लावण्यात आली आहे. २५ ते ३० वायो गटातील दोन तरुणांनी कारला आग लावून पलायन केले याशिवाय कॅम्प भागातील शरकत पार्क जवळ देखील पार्क केलेल्या दोन गाड्यांना आग लावले असल्याची माहिती मिळाली आहे.

car burntजाधव नगर येथे हेल्मेट धारी युवक दुचाकी वरून येऊन आग लावतानाची दृश्य सी सी टी व्हीत कैद झाली आहेत या अनुशांगाने पोलिसांचा तपास सुरु असताना पुन्हा तीन कार भक्ष्य झाल्या आहेत.

 आपल्या घरासमोर कार पार्क केलेल्या बेळगाव करांनी सतर्क राहण्याची गरज असून रात्री पार्क केलेल्या कार जाळणाऱ्याचा शोध पोलिसांनी घ्यावा त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.