राजकीय व्यक्ती आपले वर्चस्व राखण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. असाच अनुभव खानापूर तालुक्यात आला आहे.
जांबोटी येथील जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांच्या प्रयत्नाने चिगुळे येथे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सोय व्हावी म्हणून खानापूर येथून बस सोडण्यात येणार होती, त्याची सुरुवात गेल्या चार दिवसापूर्वी करण्यात येणार होती मात्र कोणत्यातरी वरिष्ठाच्या दबावाखाली या बसची सुरवात थांबवण्यात आली आहे.
याबाबत आज जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांनी खानापूर आगार प्रमुखाना जाब विचारला आता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, अधिकाऱ्यांना दबाव आणणाऱ्यांना जनतेच्या सोयीपेक्षा आपले वर्चस्व मोठे आहे का अशी चर्चा सुरु आहे. चालू होणाऱ्या बस ची मात्र चर्चा जोरदार सुरु आहे.