गट तट विसरून बेळगाव शहरातील समिती नेत्यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना एकत्रितरित्या अभिवादन केलं असताना बेळगाव तालुक्यातील दोन समित्यांनी दोन ठिकाणी तर खानापूर समितीच्या दोन गटांनी वेगवेगळ्या वेळी अभिवादन करण्यात आले आहे.
खानापूर तालुका समितीतील दुही मिटवण्याचा प्रयत्न होत असताना आमदार अरविंद पाटील समर्थक आणि माजी आमदार दिगंबर पाटील समर्थकांनी वेगवेगळ्या वेळी दोनदा अभिवादन केल.संयुक्त महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा असणाऱ्या कंग्राळी येथील मारुती बेन्नाळकर यांना देखील तालुका समितीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळ्या श्रद्धांजली वाहिली.
बेळगाव शहरात देखील समिती शिवसेना इतर असे दोन गट सक्रीय असताना शहरातील नेत्यांनी मात्र एकीने अभिवादन केले हाच आदर्श खानापूर तालुका समिती आणि बेळगाव तालुक्यातील नेत्यांना का घेता आला नाही हा प्रश्न आहे.
हुतात्म्यावर सीमा भागातील प्रत्येक मराठी माणसाचा अधिकार आहे मात्र दोन दोनदा अभिवादन करून विधान सभेच्या तोंडावर पुन्हा आमच्यात बेकीच आहे हेच या नेत्यांनी दाखवून दिल आहे. बेकीने दोनदा अभिवादन केलं असल्याने हुतात्म्यांचे आत्मे काय म्हणत असतील याचा देखील विचार समिती नेत्यानी केला नसेल का ?