चक्क बेळगावचे डीडीपीआयच लोकायुक्तांच्या जाळ्यात

0
4
Ddpi
 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) बसवराज नलतवाड यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी रंगेहात पकडले असून यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

तुरमुरी (ता. कित्तूर, जि. बेळगाव) येथील विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन आर. कुरी यांच्या तक्रारीवरून लोकायुक्त पोलिसांनी उपरोक्त कारवाई केली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेच्या परवाण्याचे वार्षिक नूतनीकरणाचे काम प्रलंबित होते.

हे काम करून देण्याच्या बदल्यात जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी शाळा मुख्याध्यापकांकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अर्जुन कुरी यांनी बेळगाव लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली होती.

 belgaum

सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून जिल्हा शिक्षणाधिकारी नलतवाड यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना आज शुक्रवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून लोकायुक्त तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उस्मान अवटी यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे.Ddpi

दरम्यान खुद्द जिल्हा शिक्षणाधिकारी लाच घेताना रंगेहात सापडल्यामुळे बेळगावच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.Dasra advt

तत्कालीन डी डी पी आय ए बी पुंडलिक आणि सध्याचे डी डी पी आय  नलतवाड यांच्यात बदली वरून घमासान झाले होते त्यावेळी पासून नलतवाड हे चर्चेत आले होते.Dasra advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.