शहरातील तीन सराईत गुन्हेगारांनी तिसरा रेल्वे गेट जवळील सवेरा बार समोर दारूच्या नशेत बराच गोंधळ घातल्याची घटना घडली असून तिघावर उधमबाग पोलिसांनी सार्वजनीक ठिकाणी गोंधळ दंगा केल्याचा गुन्हा नोंद केल्याची माहिती मिळत आहे . विनायक दोडडनांवर महाद्वार रोड, प्रमोद सुतार वडगाव आणी विनोद राहणार हिंडलगा अशी या सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन दंगा घालणाऱ्यांची नाव आहेत.

उधमबाग पोलिसांनी बेळगाव live ला दिलेल्या माहिती नुसार तिघे जण सवेरा बार मध्ये दारू च्या नशेत तिथल्या ग्राहकांशी भांडण करत होते त्यानंतर ते आपपसात देखील भांडंण करून मारणारी केले यात त्यातील दोघाना किरकोळ जखम देखील झाली आहे.
