मागील चार वर्षांपूर्वी शिवसृष्टीचे केवळ दोन देखावे उदघाटन केले होते शिव सृष्टी बंद होती म्हणून उरलेलं काम पालिकेने पूर्ण केलं आहे. शिव जन्मोत्सवा पासून राज्याभिषेक पर्यंतचे देखावे यात आहेत याचा बेळगाव कर जनतेनं उपभोग घ्यावा असे आवाहन महापौर संज्योत बांदेकर यांनी केलं आहे.
पालिकेच्या वतीनं शिवाजी उध्यानात शिव सृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं.यावेळी पालकमंत्री रमेश जारर्किहोळी खासदार सुरेश अंगडी, प्रकाश हुक्केरी, जिल्हाधिकारी एन जयराम, आमदार संभाजी पाटील,आमदार संजय पाटील, उपमहापौर नागेश मंडोळकर, उपस्थित होते.
निःपक्षपात पणे न्याय देणे आणि स्त्री शक्तीचा आदर हे शिवाजी महाराजांची महत्वाची कार्ये आहेत बेळगाव शहराला सांस्कृतिक वारसा आहे 30 एप्रिल रोजी होणारी शिवजयंती मिरवणुक शांततेत पार करा असा आवाहन देखील महापौरांनी केलं आहे.