विकास कलघटगी यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न , सामानाची नासधूस

0
262
theft in market shop
 belgaum

बेळगाव दि ४ : झेंडा चौक कांदा मार्केट येथील प्रसिद्ध येथील व्होलसेल किराणा व्यापारी मेसर्स वामनराव एस कलघटगी यांच्या  दुकानात अज्ञातांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि फर्निचर आणि इतर साहित्याची मोडतोड केल्याची घटना घडली आहे.या घटनेत दरवाजा गज आणि इतर फर्निचर मिळून २५ हजारचे सामानाचे नुकसान झाल आहे

याबाबत समजलेल्य अधिक माहिती नुसार शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे मोठे गज तोडून दुकानात प्रवेश करून हा प्रकार केला आहे. आतील दरवजा तोडला आहे तसच दुकानातील कपाट खोलले आहे यात काहीही समान मिळाल नसल्याने सामानची नास धूस करण्यात आली आहे .कलघटगी यांच्या दुकानासमोर असलेला हायमास्ट लाईट गेले काही दिवस बंद असून याचा फायदा घेत अज्ञातानी हा प्रकार केला आहे  दुकाना समोरच पोलीस विजीट पोइंट आहे तरी देखील याचा काहीही उपयोग झाला नाही .

कांदा मार्केट भागात अश्या चोऱ्यांचे प्रकार वाढले असून गेल्या ८ दिवसापूर्वी बागी यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता . मार्केट पोलीस उपनिरीक्षक एस सिम्मनी यांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत. मेसर्स वामनराव एस कलघटगी याचं दुकान १८९४ साली बांधण्यात आला असून मार्केट मधील दगडी बांधकामातील जुनी वास्तू आहे.

 belgaum

theft in market shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.