Saturday, April 20, 2024

/

काकती बलात्कार प्रकरणी ८ मार्च रोजी महिलांचा मोर्चा

 belgaum

बेळगाव दि ४ : काकती बलात्कार घटनेच्या निषेधार्थ गुरुवार ८ मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय महिला मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारने महिला सुरक्षा सठी प्राधान्य ध्याव,महिला वरील अत्त्याचार खपवून घेतले जाणार नाहीत यासह बेळगावात महिलांची सुरक्षा पोषक आदी मागण्या या मोर्चा त केल्या जाणार आहेत.

समस्त स्त्री शक्ती संघटनेच्या माध्यमांतून  शहरातील सर्व महिला मंडळ, संघटना लायनेस इनर व्हील क्लब आदी एकत्रित येऊन बैठक घेण्यात आली आणि मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.  कोणत्याही संघटनेने आपल्या नावाचा फलक घेऊन मोर्चात सहभागी होऊन नये मात्र निषेधाचे फलक आणावेत अस आवाहन अंजली गाडगीळ यांनी केल. मोर्चात पुरुषांनी सहभागी कराव कि नाही या बद्दल चर्चा देखील करण्यात आली . कोणत्याही महिला संघटनांनी पुरुष सघटनानी मोर्चात सहभागी व्हयाचे असेल तर प्रमोद हजारे ९९१६७४ ४६२३३ शी संपर्क  साधावा अस आवाहन करण्यात आलंय .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.