Friday, December 20, 2024

/

शॉक लागून सूळगा(हिं) येथे दोघांचा मृत्यू

 belgaum

स्टीलचे पत्रे घरावर चढवत असताना हाय व्होल्टेज विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. सदर घटना बेळगाव वेंगुर्ला रोड सूळगा(हिं) येथे घडली आहे.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या घटनेत विनायक कलखांबकर वय 24 रा.सूळगा(हिं) तर विलास अगसगेकर वय 52 रा. बेनकनहळळी जागीच मृत्यू झाला आहे.तर दीपक रा. बेनकनहळळी नावाचा युवक जखमी झाला आहे.

या घटने बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार विनायक कलखांबकर यांचे दोन खोल्यांचे घर बांधण्याचे काम चालू होते सोमवारी सदर घरावर पत्रे चढवत असताना पत्र्याला विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्या ठिकाणी काम करत असलेले दोघेजण शॉक लागून जागीच मृत्युमुखी पावले असून एक जण जखमी झाला आहे.

विलास अगसगेकर रिक्षा चालवत होते पत्रे वर चढवण्यासाठी घराचे मालक असणारे विनायक कलखाबकर त्यांना मदत करत होते. विनायक हे वॉटर सप्लाय म्हणून काम करत होते.Sulgaa two death

या घटनेबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. सूळगा वेंगुर्ला रोडवर विनायक हा नव्याने घर बांधत होता. त्यासाठी सोमवारी स्टीलचे पत्रे बसवले जात होते. विद्युत भारित वाहिनीला पत्रा लागून पत्र्यातून करंट काम करत असलेल्या तिघांना लागला मुख्य सर्विस वाहिनी असल्याने जोराचा धक्का बसून सदर घटना घडली असल्याचे समजते.

सदर घटना समजताच घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शिवाय सदर घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन साडेचारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचा आढावा घेण्यासाठी हेस्कॉम काम अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयतांचे मृतदेह जिल्हा इस्पितळात रवाना करण्यात आले असून या घटनेने या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.