बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख 54 हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार आज गुरुवारी घडला असून भर दुपारी घडलेल्या या घरफोडीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी 60 वर्षीय कल्लापा भास्कळ...
सीमा सत्याग्रही आणि ज्येष्ठ कामगार नेते ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांच्या निधनाबद्दल येत्या शनिवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चव्हाट गल्ली बेळगाव येथील श्री जालगार मारुती मंदिर येथे ही सभा होणार...
काळ इतक्या झपाट्याने बदलत आहे की आता कारागृहातील कैदी देखील हायटेक झाले आहेत. खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या पालिकेच्या एका सदस्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चक्क नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाग घेऊन आपल्या प्रभागाच्या समस्या मांडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे.
खुनाच्या आरोपाखाली कारागृहात...
रायबाग तालुक्यातील सुटट्टी येथे एका उसाच्या शेतात धाड टाकून कुडची पोलिसांनी 25 किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
हनुमंत संतराम अक्केण्णावर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. त्याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, सुटट्टी गावामध्ये...
महसूल खात्याच्या कागदपत्रातील मूळ नावात बदल करणे हा गुन्हा आहे. तसा बदल करून घेणारे व देणारे गुन्हेगार ठरत असल्यामुळे दोघांवरही कारवाई केली जाईल. तसेच यासंदर्भात महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती महसूल...
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणामध्ये सीमा भागातील मराठी माणसाचा पूर्वीपासून समावेश आहे. या खेरीज महाराष्ट्रातील मराठा समाजाला मिळणाऱ्या सर्व सोयी -सुविधा सीमाभागातील मराठी बांधवांना लागू असून त्या संदर्भात लवकरच जनजागृतीचे कार्य हाती घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मराठा आरक्षण समन्वयक, सर्वोच्च...
राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यामार्फत 'माय क्लिनिक' अर्थात माझा दवाखाना ही योजना हाती घेण्यात आली असून या योजनेअंतर्गत येत्या ऑक्टोबर महिन्यात बेळगाव जिल्ह्यात 21 दवाखान्यांची स्थापना करण्यात येणार आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या माय क्लिनिक योजनेअंतर्गत सध्या राज्यातील...