22.7 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 19, 2022

लंपी’बाबत खानापूर म. ए. समितीने केली ‘ही’ मागणी

प्रशासनाने जनावरांना होणाऱ्या लंपी स्कीन रोगाविषयी खानापूर तालुक्यात जनजागृती करून पाळीव जनावरांचे लसीकरण करावे, अशी मागणी खानापूर म. ए. समितीने तहसीलदारांकडे केली आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी खानापूर तहसीलदारांना उपरोक्त मागणीचे निवेदन...

अग्निवीर भरती मेळाव्याला प्रारंभ; हजारोंची गर्दी

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे 'अग्निवीर' अंतर्गत सोल्जर जनरल ड्युटी, ट्रेड्समन, क्लार्क, स्टोअर किपर व टेक्निकल या पदांसाठी आयोजित भव्य भरती मेळाव्याला आज सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सदर भरतीसाठी हजारो युवक शहरात दाखल झाल्यामुळे मराठा सेंटरच्या...

मुलांकडून रस्त्याची दुरुस्ती; प्रशासन मात्र झोपेतच

बेळगावात श्रमदानाने रस्ता दुरुस्त करण्याची परंपरा 1848 पासूनची असून थ्रोटन्स गॅझेटर 66 मध्ये तसे नमूदही आहे. तेंव्हापासून बेळगावकरांच्या नशीबी लिहिलेले श्रमदान कांही आजतागायत सुटलेले नाही. 1848 मध्ये बेळगावच्या तत्कालीन प्रमुख नागरिकांची समिती स्थापन झाली. या समितीच्या नेतृत्वाखाली अवघ्या चार महिन्यात...

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

परतीच्या पावसाने बेळगांव जिल्ह्याला झोडपून काढल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. मात्र आठवड्याभानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली असून शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. कडक ऊन पडत असून यामुळे काढणीला आलेल्या पिकांसाठी हे वातावरण योग्य ठरले आहे.बटाटा तसेच भुईमूग काढण्याची...

‘त्या’ खुनामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला हादरा!

बेळगाव शहरात घडलेल्या 57 वर्षीय रियल इस्टेट व्यवसायिकाच्या खुनामुळे जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्र हादरले आहे. वर्षभरात जिल्ह्यात घडलेला या पद्धतीचा हा दुसरा खून आहे. पोलीस वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करीत असले तरी दोन दिवस उलटल्यामुळे या खुनाचे गुढ...

वर्दळ मंदावली

सण समारंभाची चाहूल लागते ती बाजारपेठ मधूनच यामुळे बाजारपेठा जणू आपल्या दैनंदिन जीवनाचे दर्शनच घडवितात. यामुळेच सध्या बाजारपेठेत शांतता असून पितृपंधरवडा सुरू असल्याने बाजारपेठेत म्हणावा तितका उठाव नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मागील पंधरवड्यात बाजारपेठा फुल्ल दिसत होत्या...

…अन् संतप्त विद्यार्थ्यांनी छेडले ‘बस रोको’ आंदोलन

अधिकृत बस थांबा असून देखील गेल्या 8 -10 दिवसांपासून परिवहन मंडळाची एकही बस तेथे थांबत नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असलेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी जवळपास 2 तास 'बस रोको' आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी सकाळी मच्छे नेहरूनगर येथे घडली. याबाबतची माहिती अशी...

दक्षिण मतदार संघासाठी गुप्त रणनीती : सतीश जारकीहोळी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील राजकीय घडामोडींमध्ये आतापासूनच बदल होत असून आरोप-प्रत्यारोप, आणि टीकेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस वर्सेस भाजप हे वाक्युद्ध नेहमीपेक्षा गतिमान झाले असून भाजपने काँग्रेसवर केलेल्या टीकेचा, आरोपांचा समाचार घेत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी भाजपाची...

आता लक्ष सीमा समन्वयक मंत्रिपदाच्या नियुक्तीकडे

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण हादरले. मात्र महाराष्ट्रातील राजकीय बदल असो किंवा यानंतर सत्तेवर आलेले शिंदे सरकार सीमावासियांच्या लक्ष लागले आहे ते केवळ सीमा समन्वयक मंत्रिपदाच्या नियुक्तीवर! महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी सीमावासियांच्या...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !