20.6 C
Belgaum
Wednesday, September 27, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 12, 2022

यासाठी पोलीस निरीक्षकांचा सत्कार

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सव काळात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्यात पोलीस विभागाने महत्वपूर्ण जबाबदारी पेलली आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव काळात पोलीस विभागाने आवश्यक ती सर्व जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे. यासंदर्भात एकता युवक...

बीजगर्णी येथे टळला बस-कारचा अपघात

उ बेळगाव तालुक्यातील बेळगाव-गोल्याळी मार्गावर येणाऱ्या बीजग्रणी भागात सोमवारी सकाळी धावत्या बसचा टायर निखळून अपघात झाला. सुदैवाने बसमोरून येणाऱ्या कारचालकाने प्रसंगावधान राखून कार बाजूला नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान बेळगाव बसस्थानकातून आलेल्या बसने बीजगर्णी भागात प्रवेश...

दुचाकीचोरांना अटक: उद्यमबाग पोलिसांची कारवाई

: उद्यमबाग पोलीस स्थानकात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या तक्रारीनंतर उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तपास घेत आरोपीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत विशाल महादेव मक्कळगेरी (वय २४) रा. राजाराम नगर, उद्यमबाग बेळगाव या आरोपीला अटक...

संततधार कायम.. जनजीवन विस्कळीत; गारठले शहर

बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात गेल्या चार-पाच दिवसापासून परतीच्या पावसाने आपला दणका देणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होण्याबरोबर जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सोमवारी तर सततच्या ढगाळ पावसाळी वातावरणामुळे जनजीवन गारठून गेले आहे. गेल्या शनिवारी रात्रभर शहराला...

5 चोरटे गजाआड; 6.94 लाखाचा मुद्देमाल जप्त

तेरदाळ आणि हारूगेरी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील चोरीच्या घटनांप्रकरणी हारूगेरी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याच्या आभूषणांसह चोरीचा एकूण 6 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची अशी की, गेल्या शुक्रवारी हारूगेरी येथे मोटरसायकलवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तिघा जणांना...

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ

बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ येत्या १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी होणारा दीक्षांत समारंभ विधानसौध येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी तब्बल ४३६०७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे...

परतीच्या पावसाने वाढली पुराची भीती

गेल्या कांही दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा कहर झाल्यामुळे सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणचे 17 पूल पाण्याखाली गेले आहेत. गेल्या एक-दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह सीमावर्ती भागात असलेल्या चिक्कोडी, कागवाड, रायबाग, अथणी,...

दसरा सुट्टीला 3 ऑक्टो.पासून प्रारंभ

राज्याच्या शिक्षण खात्याने यंदाची दसरा सुट्टी जाहीर केली असून येत्या सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022 पासून 14 दिवस दसऱ्याची सुट्टी असणार आहे. यंदाच्या दसरा सुट्टीला 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून यावर्षी शिक्षण खात्याने या सुट्टीमध्ये कपात केली आहे. त्यामुळे फक्त...

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -एसपी डॉ. पाटील

अनेक गावांमध्ये मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास जवळच्या पोलीस स्थानकाला किंवा 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) डॉ. संजीव...

साऊंड सिस्टिमसाठी 6 मंडळांविरुद्ध गुन्हे

भक्तीभावाने नुकत्याच शांततेत पार पडलेल्या बेळगावातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान नियमांचे उल्लंघन करून साऊंड सिस्टिम लावल्याप्रकरणी खडेबाजार, कॅम्प आणि शहापूर पोलीस ठाण्यात एकूण 6 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपरोक्त तीन पोलीस स्थानकांव्यतिरिक्त मार्केट, टिळकवाडी...
- Advertisement -

Latest News

सहा मजली असणार बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय इमारत

बेळगाव लाईव्ह :सहा मजली भव्य इमारत बांधण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नुकतेच व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. या नियोजित...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !