Friday, May 24, 2024

/

बीजगर्णी येथे टळला बस-कारचा अपघात

 belgaum

उ बेळगाव तालुक्यातील बेळगाव-गोल्याळी मार्गावर येणाऱ्या बीजग्रणी भागात सोमवारी सकाळी धावत्या बसचा टायर निखळून अपघात झाला.

सुदैवाने बसमोरून येणाऱ्या कारचालकाने प्रसंगावधान राखून कार बाजूला नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान बेळगाव बसस्थानकातून आलेल्या बसने बीजगर्णी भागात प्रवेश केला. दरम्यान बीजगर्णी येथे बस आली असता नटबोल्ट तुटून अचानकपणे टायर निखळला आणि बसच्या पुढे गेला. बस मात्र जागीच थांबली. सुदैवाने बसमधील एकही प्रवासी जखमी झाला नाही.

या अपघातानंतर येथील नागरिकांनी राज्य परिवहन विभागावर ताशेरे ओढले असून ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसेस या खराब असल्याचा आरोप या भागातून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. लांब पल्ल्याच्या बस अतिवापरानंतर ज्यावेळी डेपोमध्ये आणल्या जातात त्यावेळी त्याच बस या ग्रामीण भागात सोडल्या जातात. आधीच लांब पल्ला गाठून दुरुस्तीला आणि बिघडण्याच्या परिस्थितीत असलेल्या बस या ग्रामीण भागात सोडल्या जातात. ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते हे सध्या मरणासन्न अवस्थेत आहेत.

 belgaum

अशातच अशा पद्धतीच्या बस या मार्गावर सोडण्यात आल्यास आधीच रस्त्यांमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करणारी जनता बसमधून प्रवास करतानाही आणखीन चिंतेत येईल, यात शंका नाही.

आजचा अनर्थ केवळ दैव बलवत्तर म्हणून टळला आहे. यामुळे परिवहन विभागानेही पुढील अपघाताची वाट न पाहता वेळीच गांभीर्य ओळखून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.