Thursday, March 28, 2024

/

दुचाकीचोरांना अटक: उद्यमबाग पोलिसांची कारवाई

 belgaum

: उद्यमबाग पोलीस स्थानकात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या तक्रारीनंतर उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तपास घेत आरोपीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत विशाल महादेव मक्कळगेरी (वय २४) रा. राजाराम नगर, उद्यमबाग बेळगाव या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपीकडून बजाज कंपनीची सिटी१०० लाल रंगाची (वाहन क्रमांक के ए ३१-के-७८७१) अंदाजे २५००० रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.Police

 belgaum

याचप्रमाणे हिरो स्प्लेंडर (वाहन क्रमांक के ए २२ इव्ही ८८६३) अंदाजे ३०००० रुपये किमतीची दुचाकी तसेच वाहन क्रमांक नसलेली एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी अशा एकूण तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पोलीस पुढील तपास घेत आहेत. या कारवाईत रामांना बिरादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपींनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.