Thursday, May 23, 2024

/

डिजिटल स्टुडिओला भीषण आग; लाखोंचे नुकसान

 belgaum

डिजिटल स्टुडिओला भीषण आग लागून महागडे कॅमेरे वगैरे किमती साहित्य जळून भस्मसात झाल्याने सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील नंदगड बाजारपेठेमध्ये आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

नंदगड (ता. खानापूर) बाजारपेठमधील मयूर बसवराज कापसे यांच्या मालकीच्या घराच्या दर्शनीय भागात माणिक कुरीया नावाचा तरुण आपला डिजीटल स्टुडिओ चालवतो. सदर स्टुडिओला आज सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

आग इतकी भीषण होती की त्यामध्ये महागडे कॅमेरे, कॉम्प्युटर्स, अद्यावत झेरॉक्स मशीन व इतर साहित्य पूर्णतः जळुन खाक झाले. यामुळे माणिक कुरिया याचे जवळ जवळ 8 ते 10 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. भल्या पहाटेची वेळ असली तरी आसपासचे नागरिक व गावकरी मदतील धाऊन आले. सर्वांनी पाणी ओतून तसेच नळाच्या लांब पाईपने पाण्याचा फवारा मारून महत्प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.Burnt studio

 belgaum

नागरिकांनी प्रसंगावधान राखून लागलीच मदतकार्य हाती घेतल्यामुळे आग आसपासच्या घरांमध्ये न पसरता पुढील संभाव्य अनर्थ टळला. मात्र दरम्यान स्टुडिओतील साहित्य आगीमुळे बेचिराख झाले.

आगीचे निश्चित कारण सकाळी समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा कयास आहे. माणिक कुरिया हा एक मेहनती कर्तृत्ववान तरुण म्हणून सुपरीचीत आहे.

त्याच्या बाबतीत ही दुर्घटना घडवून अपरिमीत नुकसान झाल्यामुळे गावकऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या दुर्घटनेची पाहणी करून सरकारने माणिक याला मदती दाखल भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.