Friday, May 24, 2024

/

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -एसपी डॉ. पाटील

 belgaum

अनेक गावांमध्ये मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास जवळच्या पोलीस स्थानकाला किंवा 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे फिरत्या विक्रेत्यांना अडवून त्यांना जाब विचारण्याचे प्रकार घडत असून रविवारी रामेश्वरला दर्शनासाठी निघालेल्या चार नागा साधूंना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली. कौजलगी (ता. गोकाक) येथील मुलांचे अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून या चार साधुंना अडवून नागरिकांनी त्यांना घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

मात्र पोलीस चौकशीत ओळखपत्रावरून ते अपहरणकर्ते नसून नागा साधूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेरीगेरी (ता. कित्तुर) येथे चादरी विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून स्थानिक नागरिकांनी कित्तूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

 belgaum

कौजलगीपाठोपाठ अवरोळी येथे गावकऱ्यांनी एका वृद्धाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र चौकशीअंती तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे आढळून आले आहे. या घटनेनंतर नंदगड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही फिरत्या व्यापाऱ्यांवर संशय घेतल्याचे प्रकार घडले आहेत. या घटनांनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट वायरल होत आहेत. मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. परिणामी नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकंदर गेल्या एक-दोन दिवसातच अपहरणांच्या अफवांचे सर्वत्र लोण पसरले आहे.Sanjiv patil sp

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी काल रविवारी रात्री नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. अनेक गावात मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. सोशल मीडियावर कसलीही खात्री न करता मेसेज पाठविले जात आहेत. फिरत्या विक्रेत्यांवर संशय घेतला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास जवळच्या पोलीस स्थानकाशी किंवा 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुखांनी केवळ केले आहे. केवळ संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एका मुलाचे अपहरण झाले होते.

या प्रकरणी संशयीतांना अटक झाली आहे. हे प्रकरण वगळता अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे देखील पोलीस प्रमुख (एसपी) डॉ. संजीव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.