17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

Daily Archives: Sep 4, 2022

अथणी शुगर्सचा या प्रशस्तीने गौरव

अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अ‍ॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदार संघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन...

*त्या 22 शाळा उद्यापासून सुरू: गोल्फ कोर्स मधील शोध मोहीम अयशस्वी*

वन खात्याकडून गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली ऑपरेशन बिबट्या शोध मोहीम अखेर अपयशी ठरली आहे रविवारी तिसाव्या दिवशी मोठ्या प्रमाणात वन खाते आणि पोलीस खात्याने दिवसभर गोल्फ कोर्स जंगलात ज कोंबिंग ऑपरेशन राबविले मात्र बिबट्याला पकडण्यात रविवारी ही वन...

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; गणेश भाविकांवर हल्ला

बिबट्याच्या दहशती नंतर आता बेळगावकरांना भटक्या कुत्र्यांची समस्या त्रस्त करत आहे. या कुत्र्यांचा उपद्रव आता गणपती बघायला आलेल्या भाविकांना सहन करावा लागत असून भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भाविक जखमी झाल्याची घटना सरदार हायस्कूल परिसरात घडली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस माजवला...

शहर तालुका उपनगरात रेकॉर्ड ब्रेक महाप्रसाद संपन्न

गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे संकट टळून सर्व अटी-नियम, निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अपूर्व उत्साहात साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवाचा पाचवा योगायोगाने आजचा रविवार असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आज रेकॉर्ड ब्रेक महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संपल्यानंतर...

गोल्फ कोर्स जंगलातील मोरांचा आवाज कमी झाला?

बिबट्याचा वावर असलेल्या बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसराच्या वनराईतील मोरांचा आवाज येणे अलीकडे बंद झाल्यामुळे बिबट्याने त्यांचा फडशा पडला की काय? अशी साशंकतापुर्ण भीती व्यक्त केली जात आहे. गोल्फ मैदान परिसरात असलेल्या लोकवस्ती मधील प्रत्येक कुटुंबाला सध्या बिबट्याला पकडण्याची प्रतीक्षा...

बाकनुरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा बैलावर हल्ल्याचा प्रयत्न

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू असताना मंडोळी येथे आढळून आलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्याने आज रविवारी दुपारी एका बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोकनूर येथे घडली आहे. त्यामुळे संबंधित बिबट्या सदृश्य प्राण्याचा बेळगाव तालुक्याच्या पश्चिम...

इंडिगोची आता सकाळच्या सत्रातही बेळगाव -बेंगलोर सेवा

ज्यादा प्रवासी संख्येमुळे बेंगळूरहून बेळगावला सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू करावी अशा अनेक दिवसांपासूनच्या मागणीला आता यश आले असून इंडिगो एअरलाइन्स कंपनी येत्या 30 ऑक्टोबरपासून बेंगलोर -बेळगाव या मार्गावर सकाळच्या सत्रात अतिरिक्त विमान सेवा सुरू करणार आहे. कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बेंगलोर...

बिबट्या माघारी पुन्हा आपल्या स्वगृही तर गेला नसेल ना?

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारलेल्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास महिना झाला सर्वतोपरी प्रयत्न करूनही वन खात्याला अद्याप यश आलेले नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून तर बिबट्या गायबच असून 27 ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे कोठेच...

गोवऱ्यांवरील मोफत अंत्यसंस्कार गणेशोत्सवानंतर

बेळगाव शहरातील सदाशिवनगर व शहापूर या दोन स्मशानभूमीमध्ये गोवऱ्यांच्या माध्यमातून मोफत अंत्यसंस्कार करण्याची महापालिकेने आखलेली योजना गणेशोत्सवानंतर कार्यान्वित होणार आहे. या योजनेची जबाबदारी महापालिकेने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडे दिली आहे. सदर योजना खरंतर गेल्या जूनच्या प्रारंभी सुरू...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !