अपघात होऊन मयत झालेल्याच दिवशीचं जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कुटुंबाला लाखांची शासकीय मदत पोचवत पुन्हा एकदा कार्यतत्परता दाखवली आहे.
आरटीओ सर्कलजवळ मोठ झाड पडून जागीच मृत्यू झालेल्या तरुणाच्या वारसांना तातडीने पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई पोचवली आहे.
मंगळवारी सकाळी राकेश लगमप्पा...
शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळाची आवड असणाऱ्या क्रीडाप्रेमी कुटुंबात जन्मलेला विश्वंभर कोलेकर हा युवा धावपटू सध्या क्रीडा क्षेत्रात चमकत आहे. वडिलांचा आदर्श आणि मोठ्या बहिणीच्या यशाला आपल्या जीवनाची प्रेरणा मानून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेळगावच्या विश्वंभर कोलेकर...
बेळगावमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर बृहत सर्वेक्षण करून 11234 शेतकऱ्यांना एकूण 17.01 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज दिली.
गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बेळगाव जिल्ह्यात झालेल्या...
बेळगाव महापालिका व्याप्तीतील अनगोळ येथील प्रभाग क्र. 51 व 52 (पूर्वीचे 6 व 5) या प्रभागांच्या अन्यायकारी वादग्रस्त पुनर्रचनेच्या विरोधात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यात 51 आणि 52 प्रभाग मध्ये निवडणुकीत उभे असलेल्या 14...
गणपती विसर्जनापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सोमवार पर्यंत शहर परिसराला झोडपून काढले. पावसाची संततधार सोमवारी रात्रीपर्यंत सुरूच होती. मात्र, मंगळवारी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असून तीन-चार दिवसांनी बेळगावंकरांना सूर्यदर्शन झाले आहे.
परतीच्या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन पुन्हा एकदा...
गणेशोत्सव पार पडला असून गणरायाचे विसर्जन विविध मंडळांना देण्यात आलेले विद्युत कनेक्शन देखील कट करण्यात आले आहे.मात्र हेस्कॉम चा थोडासा हलगर्जीपणा नागरिकांसाठी धोक्याचा ठरत असून विद्युत खांबावरील कनेक्शन कट करून सदर कनेक्शन वायर तशीच लोंबकळत टाकण्याचा प्रकार आचार्य गल्ली...
बेळगाव शहराच्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम या सप्टेंबर महिन्याअखेर पूर्ण केले जावे, अशी सक्त सूचना खासदार मंगला अंगडी यांनी केली आहे. रेल्वे स्थानक नूतनीकरण कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही सूचना नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली.
खासदार मंगला अंगडी यांनी काल सोमवारी...
बेळगाव जिल्ह्यातील पूर परिस्थितीकडे जिल्हा पालक मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असून अतिवृष्टीमुळे जनतेचे जे हाल होत आहेत त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
गोकाक येथील आपल्या कचेरीमध्ये ते आज मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते....
रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार करून 'माहेर सोडून तात्काळ सासरी चल नाही तर गोळ्या घालून ठार करेन आणि मी देखील गळफास घेऊन आत्महत्या करेन', असे आपल्या पत्नीला धमकावणाऱ्या पतीला पोलिसांनी गजाआड केल्याची घटना अथणी (जि. बेळगाव) येथे घडली आहे.
शिवानंद कालेबाग (रा....
वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या जागी कोण? याबद्दल अद्याप कोणतीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण राज्यसभा सदस्यांना इरण्णा कडाडी यांनी दिली आहे.
बेळगाव शहरात आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. वन खात्याचे मंत्री...