17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

Daily Archives: Sep 8, 2022

विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस विभागाने कसली कंबर!

गेले ९ दिवस उत्साही वातावरणात सुरु असलेला गणेशोत्सव आणि यंदा दहाव्या दिवशी निघणारी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस विभागाने कंबर कसली असून मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मिरवणूक वेळेत, शांततेत आणि सुरळीतपणे पार...

कसा आहे श्री विसर्जन मिरवणुकीचा मार्ग?.. वाचा बेळगावLive….

बेळगाव : गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे श्री गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षातील कसर यंदाच्या श्रीगणेशोत्सवात भरून निघाली असून शुक्रवारी श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशभक्त, प्रशासन, पोलीस विभाग सज्ज झाला आहे. उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी...

अखेर गणेश विसर्जन तलाव झाला स्वच्छ!

गेल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसाचे रस्त्यावरील सांडपाणी पवित्र कपिलेश्वर तलावामध्ये मिसळण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अनेकांच्या प्रयत्नाने या तलावाची स्वच्छता झाली आहे गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे विनंती केली होती...

स्थानिकांना संधी नसेल तर राजीनामा देऊ : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून पक्षांतर्गत नाराजी आणि असमाधान व्यक्त होत आहे. बेळगाव काँग्रेसमध्ये देखील इच्छुक उमेदवाराच्या नावावरून नाराजीचा सूर उमटत असून स्थानिकांना संधी न दिल्यास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला राम राम ठोकण्याचा...

कत्ती कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मंत्र्यांची हजेरी

वन, अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बंगळुरूमध्ये निधन झाले. त्यानंतर बुधवारी त्यांचे पार्थिव विशेष विमानातून बेळगावमध्ये आणण्यात आले. बेळगावमध्ये अंतिमदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी बेळगावमध्ये हजेरी लावली....

‘नीट’ टॉपर ऋचा पावशेचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न!

बेळगाव Live विशेष : देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नीट युजी 2022 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत बेळगावच्या ऋचा मोहन पावशे हिने राज्यात दुसरा तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल बेळगाव Liveने ऋचाचे अभिनंदन करून प्रतिक्रिया जाणून घेतली...

गणेश उत्सवात बेळगाव live चा सामाजिक उपक्रम

बेळगाव live च्या वतीनं गणेशोत्सव निमित्त सामाजिक संदेश देणारे घरगुती देखावे, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि विधायक गणेश मंडळाचा सत्कार असा संयुक्तिक कार्यक्रम नरगुंदकर भावे चौक गणेश मंडपात झाला.मराठा बँकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली...

पहिल्या रेल्वे गेट बॅरिकेड्स समस्येची पीएमओने घेतली दखल

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील अन्यायकारक बॅरिकेड्स विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोलप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक आणि दुकानदार व्यापाऱ्यांनी आठ वर्षापासून छेडलेल्या बॅरिकेड्स हटाव आंदोलनाला यश येण्याची चिन्हे अखेर दिसू लागले आहेत. या आंदोलनाची दखल घेताना पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ)...

हा’ रेल्वे ओव्हर ब्रिज खुला होण्याचा मुहूर्त लागणार तरी केंव्हा?

टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्याने उभारण्यात आलेला रेल्वे ओव्हर ब्रिज नागरिकांच्या सोयीसाठी आहे की त्यांची गैरसोय निर्माण करण्यासाठी? असा संतप्त सवाल सध्या या मार्गावरून नेहमी ये -जा करणाऱ्या वाहन चालक करत आहेत. या ना त्या कारणास्तव हा ब्रिज...

अन…गर्दीने फुलू लागले आहे बेळगाव शहर

बाप्पाचे आगमन होऊन साधारण 9 दिवसाचा कालावधी उलटला आहे.यामुळे गणेश भक्तामधील उत्साह वाढला असून देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.बुधवारी रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी आलेल्या भक्तांमुळे रस्ते गर्दीने फुलले होते. भव्य मूर्ती आणि अर्थपूर्ण देखावे यामुळे भक्तांचा...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !