दहावीच्या बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील महत्त्वाची परीक्षा मानली जाते.यामुळे शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची विविध परीक्षांच्या माध्यमातून तयारी करून घेतली जाते.त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे दहावीची सहामाही परीक्षा. दसरा सुट्टीनंतर दहावीची सहामाही परिक्षा घेण्यात येणार आहे.
दहावीची सहामाही परीक्षा 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.कोरोनामुळे गेली दोन वर्ष विविध परीक्षांना ब्रेक लागला होता.शाळास्तरावर परीक्षा न होता विद्यार्थ्यांना घरीच पेपर सोडवावे लागले होते. मात्र यंदा सालाबाद प्रमाणे सहामाही परीक्षा पार पडणार आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष 16 मे पासून सुरू झाले असून ऑक्टोबर महिन्यात सहामाही परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार 17 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार असून याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रारंभी संघटनेने 24 सप्टेंबर पासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीचे नियोजन व दसरा सुट्टी यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून आता सुट्टीनंतर विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
परीक्षेचे वेळपत्रक
सोमवार दिनांक 17 रोजी मराठी, कन्नड, इंग्रजी प्रथम भाषा
मंगळवार दिनांक 18 रोजी इंग्रजी, कन्नड द्वितीय भाषा
बुधवार दिनांक 19 रोजी गणित
गुरुवार दिनांक 20 रोजी समाज विज्ञान
शुक्रवार दिनांक 21 रोजी कन्नड, इंग्रजी तृतीय भाषा
शनिवार दिनांक 22 रोजी विज्ञान