इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी तर्फे बेळगावचे नगरसेवक विनायक गुंजटकर यांना भारत ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे २६ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला जाईल.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार दिला जातो.
भारताची आर्थिक प्रगती याविषयावर होणाऱ्या राष्ट्रीय सेमिनार मध्येही गुंजटकर यांना भाग घेण्याची संधी मिळणार आहे.महा पालिकेत देखील गुंजटकर यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे