बेळगाव हुन मैसूर आणि बीदर साठी नव्या ए सी स्लीपर कोच बस सेवा तर बेळगाव बंगळुरू चेन्नई दरम्यान नवीन मल्टी एस एल क्लब क्लास बस सेवांची सुरुवात गुरुवारी सकाळी करण्यात आली. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे अध्यक्ष सदानंद डुंगन्नावर ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलट्टी यांनी हिरवा झेंडा दाखवत नवीन बस सेवा सुरु केली. यावेळी एस एस आर टी सी अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव मैसूर नवीन एस सी स्लीपर बस सेवा सुरु करण्यात आली असून बेळगाव हुबळी धारवाड वाया शिमोगा आर्शीकेरे मैसूर अशी असणार आहे दररोज रात्री ९:३० वाजता बेळगाव सुटणार असून सकाळी ८: ३० मैसूर ला पोचणार आहे . बेळगाव बीदर नवीन ए सी स्लीपर बस सेवा बेळगाव जमखंडी विजापूर जेवर्गी बीदर असणार आहे रात्री ९:०० वाजता बेळगाव हुन निघेल तर सकाळी ७ वाजता बीदर ला पोचणार आहे . बेळगाव बंगळुरू चेन्नई या मल्टी एक्स एल बस बदलून नवीन मल्टी एक एल क्लब क्लास बसे सुरु करण्यात आली आहेत
Excellent news