इराक येथे जन्मलेल्या त्या बालकास हृदयाला दोन छिद्रे होती, सहा महिन्यांच्या त्या बालकास शेवटी उपचारांसाठी बेळगावला आणण्यात आले आणि बेळगावच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या जीवनाची दोरी बळकट केली.
येथील लेक्व्ह्यु हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ शरद श्रेष्टी, डॉ सुनीलकुमार, डॉ प्रशांत एम बी यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.
इराकच्या बशीर नामक व्यक्तीचे हे बालक या त्रासाने ग्रस्त होते. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांनी सर्वत्र संपर्क करून आपल्या बालकाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. बेळगावच्या काही ओळखीच्या व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हृदय रोग तज्ञ डॉ प्रभू हलकट्टी यांच्याशी संपर्क साधला होता.साडेचार तास ही शस्त्रक्रिया करून या बालकाचा त्रास कमी करण्यात आला आहे. हृदय रोग तज्ञ डॉ अमृत नेरलिकर यांनीही या मोहिमेत भाग घेतला होता.