बेळगाव दि ४ :महापौर निवडणुकीत मराठी भाषिक नगरसेवकांच संख्याबळ अधिक होत त्यामुळे मराठी भाषिक महापौर झाला आहे यात कन्नड भाषिकांचा अपमान झाला आहे अस मला वाटत नाही अस मत रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलय . महा पालिका विकास आढावा बैठकी नंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
संख्याबळ अधिक आहे ही गोष्ट मान्य करत पालक मंत्र्यांनी बेळगाव वर मराठीची पकड आहे अस एक प्रकारे कबुली दिली आहे. यमकनमर्डी विधान सभा मतदार संघातून लखन जारकीहोळी तर रायचूर ग्रामीण मधून सतीश जारकीहोळी पुढील विधान सभा निवडणूक लढवतील असंही जारकीहोळी यावेळी म्हणाले.
सतीश आणि रमेश जारकीहोळी बंधूच्या वाद सुरु असताना पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याकडे राजकीय विश्लेशकांच लक्ष लागल आहे .