बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी पुन्हा एम. जी. हिरेमठ यांची सरकारने नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. लवकरच ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून एम. जी. हिरेमठ यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्याजागी डॉ. के. हरिशकुमार यांची हंगामी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
आता निवडणूक आचारसंहिता संपली असल्याने सरकारने हिरेमठ यांची पुन्हा बेळगाव जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे.
एम. जी. हिरेमठ यांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील के. के. कोप्प आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तीला निवडणूक काळात सरकारी अधिकारीपदी ठेवू नये असा संकेत आहेत त्यामुळे त्यांची बदली झाली होती.