18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 1, 2021

‘त्या’ बेळगावच्या पॉजिटिव्ह पत्रकारांवर औषध उपचार करा-उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

मतमोजणी केंद्रात उपस्थित राहण्यासाठी कोविड निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र गरजेचे आहे त्याकरिता वार्ता भवनात पत्रकारांची कोविड टेस्ट करण्यात आली होती त्या टेस्ट मध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 12 पत्रकार कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. कोविड पॉजिटिव्ह आढळलेल्या पत्रकारांना आयसोलेशन मध्ये...

खासदार कोण रविवारी होणार फैसला…

बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार असून सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे.तेथेच मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत.भाजपच्या मंगला अंगडी,काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील...

महाराष्ट्रदिनी राज्यपालांचा जनतेसाठी संदेश!

महाराष्ट्राच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राला उद्देशून विशेष संदेश दिला. तसेच, सध्याच्या संकट काळामध्ये राज्यातील जनतेनं करोनासंदर्भातले नियम पाळून सुरक्षित व्हावे, असे आवाहन करण्यासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना त्यांनी...

इथे सामूहिक अंत्यसंस्काराची तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेमुळे वाढत चाललेली मृतांची संख्या लक्षात घेऊन शहरातील स्मशानभूमीमध्ये सामूहिक अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे. अंजुमन इस्लाम कबरस्थान यामध्ये तर सुमारे 20 कबरी खोदून तयार ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे मृत पावणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे...

सरकारचा नवा वटहुकूम : शिक्षक बदली होणार सक्तीची

कर्नाटक नागरी सेवा अंतर्गत शिक्षक बदली नियंत्रण कायद्यातील दुरुस्तीला राज्यपालांनी मान्यता दिल्यामुळे सरकारने गुरुवारी नवा वटहुकूम जारी केला आहे. त्यानुसार यापुढे बदली प्रक्रिया विरोधात कोणत्याही शिक्षकाला न्यायालयात जाता येणार नाही. त्यामुळे दरवर्षी बदली प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होणार...

लसीकरणासाठी गर्दी : कोरोना नियमावलीचा फज्जा

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य खाते आणि प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विविध ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे कोरोना नियमावलीचा फज्जा उडत आहे. आरोग्य खाते आणि प्रशासनाकडून प्राथमिक...

…अन् ‘यांच्या’ मदतीमुळे आणखी दोघे कामगार आपल्या गावी सुखरूप

गोवा येथे फसवणूक झाल्यानंतर कसेबसे बेळगाव गाठणाऱ्या उत्तराखंड आणि मुंबई येथील दोघा असहाय्य कामगारांना मदतीचा हात देताना बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते विनायक केसरकर यांनी त्या उभयतांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या बिकट परिस्थितीत त्यांना त्यांच्या गावी...

उदयन राजेंनी केलं बेळगावच्या युवकाचे कौतुक

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे धारकरी, दुर्गवीर कंग्राळ गल्ली येथील नरेश शिवाजीराव जाधव यांनी पेनच्या टोकावर बसवता येईल असा छोटा जिरेटोप बनवून तो छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज छत्रपती श्री. उदयनमहाराज भोसले (सातारा) यांना भेट म्हणून पाठवला होता. याची...

जिल्हा आणि तालुका पंचायतींचे आरक्षण जाहीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्व निवडणुका 6 महिने लांबणीवर टाकण्यात आल्याचे राज्य सरकारने जाहीर करून दोन दिवस उलटले नाहीत तोवर बेळगाव जिल्हा पंचायतीसह तालुका पंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सदर आरक्षणानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीमधील एकूण 101 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !