19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 20, 2021

शेतीत शिरले ड्रीनेजचे पाणी

रेल्वे तर्फे दुपदरी रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.या कामासाठी रेल्वेने ड्रेनेजपाणी वाहून नेणारा नाला फोडल्याने दुर्गंधीयुक्त पाणी हजारो एकर शेतात पसरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. उज्वल नगर, अमन नगर, गांधी नगर येथून येणारे ड्रेनेज मिश्रित नाल्याचे पाणी नाला...

कल्लेहोळ गावात प्रवेश केल्यास 7000 रु. दंड

कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करण्याबरोबरच गावात संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय गावात येणाऱ्या हौशी मंडळींना धडा शिकविण्यासाठी कल्लेहोळ (ता. बेळगाव) गावातील गावकऱ्यांनी एक नामी शक्कल लढविली असून विनापरवाना अकारण गावात येणाऱ्यांना 7 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला...

‘या’ केरकचर्‍या संदर्भात कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्यांचे आवाहन

कंग्राळी खुर्द गावानजीकच्या मार्कंडेय नदी किनारी रस्त्याशेजारी केरकचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने आज कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांनी रस्त्याशेजारी कचरा टाकू नये, असे आवाहन केले. कंग्राळी खुर्द गावानजीकच्या...

20 मुलांवर ‘झायको व्ही-डी’ ची यशस्वी चांचणी : डॉ. अमित भाते

शहरातील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक स्वदेशी झायको व्ही-डी लसीची 20 मुलांवरील चांचणी यशस्वी झाली असून लस दिल्यानंतर दोन महिन्याच्या कालावधीत एकाही मुलाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्टचा त्रास अथवा आरोग्याबाबतच्या तक्रारी झाल्या नसल्याची माहिती डॉ. अमित भाते यांनी दिली. देशातील दुसऱ्या...

संसर्गजन्य रोग कायद्यांतर्गत शहरात तीन गुन्हे दाखल

बेळगाव पोलिसांनी कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्याअंतर्गत बुधवारी तीन गुन्हे दाखल केले असून अनावश्यक फिरणारी 35 वाहने जप्त करण्याबरोबरच विना मास्क फिरणाऱ्या 290 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. लॉक डाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई सुरूच असून कॉलेज रोडवरील...

दिव्यांग व्यक्तींना ‘यांनी’ केली जीवनावश्यक साहित्याची मदत

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नियती फाउंडेशनतर्फे शहरातील ज्योतीनगर या दुर्लक्षित वसाहतीतील गरीब गरजू दिव्यांग (शारीरिक विकलांग) व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याचे किट्स वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. शहरातील भाजप नेत्या आणि नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज...

कोरोनामुळे नोकरी गमावलेले युवक बनताहेत केअरटेकर्स

कोराना प्रादुर्भावामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्यामुळे उपजीविकेसाठी या प्रादुर्भाव काळात देखील त्यांना पर्याय नोकरी शोधावी लागत आहे. कोरोनाग्रस्तांना त्यांच्या घरी वाळीत टाकल्याप्रमाणे सर्वांपासून वेगळं ठेवलं जातं हे सर्वश्रुत आहे. नातलगांच्या गैरहजेरीत अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी कांहीजणांनी केअरटेकर...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयपदी दत्ता जाधव

महाराष्ट्रातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बेळगाव जिल्हा समन्वयपदी बेळगाव शिवसेनेचे नेते दत्ता जाधव यांची वर्णी लागली आहे. शिवसेना वैद्यकी कक्ष महाराष्ट्राचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तसे नियुक्तीपत्र जाधव यांना धाडले आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात दत्ता जाधव यांनी महाराष्ट्र एकीकरण...

बेळगावात डीआरडीओ कोवीड चिकित्सा केंद्र सुरु करा

कोरोनामुळे निर्माण झालेली सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता डीआरडीओच्यावतीने कर्नाटकातही विशेष कोवीड चिकित्सा केंद्रे सुरू करावीत, अशी विनंती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली, वाराणसी आणि लखनऊ या शहरांमध्ये डीआरडीओच्यावतीने विशेष कोवीड चिकित्सा...

‘ब्लॅक फंगस’ हा कोरोना रोग नव्हे : डॉ. माधव प्रभू

म्यूकोर मायकाॅसिस अर्थात 'ब्लॅक फंगस' हा कोरोना रोग नाही. तथापी कोरोना प्रमाणेच शरीरातील प्रतिकार शक्ती कमी झाल्याने होणारा आजार असून थोड्या उपायांनी आपण त्याला पसरण्यापासून रोखू शकतो, अशी माहिती सुप्रसिद्ध वैद्य डॉ. माधव प्रभू यांनी दिली. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !