18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: May 10, 2021

किराणामाल भाजीपाला आणण्यासाठी वाहनाची परवानगी

लॉक डाऊन 2 मध्ये सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवेसाठी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.सुरुवातीच्या मार्गदर्शक तत्वात भाजीपाला किंवा किराणा माल आणण्यासाठी चार चाकी किंवा दुचाकी वापरास बंदी घालण्यात आली होती मात्र आता राज्य पोलीस महासंचालक प्रवीण...

बनावट ओळखपत्रे बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना बनावट ओळखपत्र करून देणारे एक रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे.पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे. बनावट ओळखपत्र करून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.खडेबाजार पोलिसांनी कडोलकर गल्लीतील एका प्रिंटिंग...

डॉक्टर व हॉस्पिटलवरील ‘तो’ हल्ला निंद्य -किरण जाधव

बेळगाव शहरातील पोलीस, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्या कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहून सामान्यांसाठी दिवस-रात्र झटत आहेत. ही वस्तुस्थिती असताना काल रात्री शहापूर येथे समाजकंटकांनी एका हॉस्पिटलवर हल्ला चढवून डॉक्टर आणि वैद्यकीय...

प्रत्येक वार्डात आता भाजी, फळे आणि फुलांच्या विक्रीची व्यवस्था

कोरोना प्रादुर्भाव आणि सध्याच्या लॉक डाऊनच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील सर्व प्रभागांमध्ये भाजीपाला, फळे आणि फुले विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता बागायत खाते, कृषी उत्पादन विक्री समिती, जिल्हा होपकॉम्स आणि शेतकरी उत्पादक निर्यातदार यांनी संयुक्तरीत्या...

कंग्राळी खुर्दमध्ये 16 पर्यंत ‘बंद’ : कोरोनाला रोखण्यासाठी स्तुत्य उपक्रम

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक दरम्यान बदली झालेले पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी पुन्हा एपीएमसी पोलीस स्थानकात रुजू झाले असून पदभार स्वीकारताच ते झपाट्याने लॉक डाऊनच्या कामाला लागले आहेत. त्यांच्या पुढाकाराने कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि. 11 मेपासून सलग 6 दिवस...

बेड नाहीत म्हणून सिव्हिल मधून रुग्णाला परत पाठवू नका-

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची परवड होत आहे तिथे ऑक्सिजन बेडस कमी आहेत त्यांची संख्या वाढवून घ्यावी, कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला परत पाठवून नका असे निर्देश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सिव्हिल प्रशासनाला द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे. सोमवारी...

‘सिव्हील’चा कॅज्युलीटी फोन बंद : नागरिक त्रस्त

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि मृत्यूमुळे सध्या जवळपास आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात भर म्हणून सध्या सिव्हील हॉस्पिटलचा कॅज्युलीटी फोन बंद असल्यामुळे चौकशी करताना त्रास होत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलची भूमिका महत्वाची...

घटले कोरोना चाचण्यांचे प्रमाण : पॉझिटिव्हिटी झाली 31 टक्के

मेडिकल बुलेटिनने काल 9 मे रोजी नव्याने आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 613 इतकी घटल्याचे म्हंटले होते. जी स्वागतार्ह बाब असली तरी दुसरीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण 2 हजार पेक्षा कमी झाले आहे, याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ काल रविवारी 9 मे...

सरकारने ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना केली ‘ही’ सूचना

ऑक्सिजन अभावी अनेक कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागत असल्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या सरकारने ऑक्सीजन साठ्याची रोजच्यारोज माहिती नोडल अधिकाऱ्यांना द्यावी. तसेच फक्त हॉस्पिटल्स आणि कोवीड सेंटरनाच ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करावा, अशी सक्त सूचना ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना दिली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा...

कोरोना रुग्णांवर आता त्या-त्या तालुक्यातच उपचार

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे सिव्हील हॉस्पिटलवरील ताण वाढला असून हा ताण हलका करण्याच्या उद्देशाने आता प्रत्येक तालुक्यामध्ये त्या -त्या ठिकाणच्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जावेत, अशी सूचना आरोग्य खात्याला देण्यात आली असल्याची माहिती मावळते जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी काल...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !