राज्यात आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा च्या प्रमाणावर आधारित केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे राज्यातील ऑक्सिजनची समस्या तीन चार दिवसात संपेल अशी माहिती उद्योगमंत्री आणि राज्याच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी असलेले जगदीश शेट्टर यांनी शासकीय विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ऑक्सिजन तुटवड्या संबंधी शेट्टर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या ऑक्सिजन बाबत महाराष्ट्राशी चर्चा करण्यात येईल.
बळळारीहून महाराष्ट्राला जाणाऱ्या ऑक्सिजन बाबत देखील चर्चा महाराष्ट्राशी चर्चा करण्यात येणार आहे.केंद्र सरकार देखील ऑक्सिजन टँकर देणार असून त्यापैकी एक टँकर बेळगाव जिल्ह्याला मिळणार आहे.होम अयसोलेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तींना औषधांचे किट देण्या बरोबर त्यांना आयसोलेशन मध्ये घ्यायच्या खबरदारी बद्दल आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी माहिती द्यावी अशी सूचना शेट्टर यांनी केली.
सरकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेंटिेलेटरचा वापर करण्याबाबत नियोजन करावे. कोरोना टेस्ट केल्यावर त्याचा रिपोर्ट शक्य तितक्या लवकर देण्यात यावा.त्यामुळे संक्रमण रोखण्यास मदत होईल.
जिल्हा रुग्णालयात डॉकटर,तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचारी भरती करण्या बाबत राज्य सरकारने अनुमती दिली आहे.त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी सूचनाही जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केली.