Wednesday, November 27, 2024

/

महिला दिन आणि अजूनही महिला दीनंच

 belgaum

आठ मार्च. जागतिक महिला दिन. महिला सशक्तीकरण दिवस. आम्ही सशक्त  तर आधीपासूनच होतो. आमची शक्ती, आमचे
शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून
शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परीभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा आणखी कोणते
कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे.
बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमीकांव्यतिरीक्त अिधकारी,
वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना
अधिक चमक तिने आपल्या कतृर्त्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या
जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते
की स्त्रीचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच
आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षत, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या
बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परीवतर्नाची दिशा मिळालीच नाहीये. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो
आणि रात्रीच्या किड्यांच्या किरकिरीत  संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी ‘ठेविले अनंते तैसेची राहिले असे म्हणत
नवर्‍याची मारहाण सहन करण्यात अख्खं आयुष्य घालवत असतात. पण या आरशाची एक बाजू फारच सुंदर आहे तर दुसरी
तेवढीच कुरूप. ह्या दिवशी दहा मिनटं थांबून जर विचार केला तर आपल्याला आत्मग्लानीच होईल, की आपण फक्त आपलाच
विचार केला आहे. दुसर्‍याचा नाही. आणि याची परिभाषा विकास आहे. तर तो फक्त स्व:विकासच आहे.
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल
तशी मानवंदना म्हणून महिला दिन साजरा करण्याचे ठरले. वरकरणी पाहता त्यात चुकीचे असे काही नाही, पण तरीही काही प्रश्न
पडतात अन् ते कधी कधी अनुत्तरीतच राहतात. प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला
लावणारे…..
महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळेपणात  आपण किती दिवस राहणार
आहोत?
ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ या दिनाच्या निमित्ताने तरी
पोचणार आहोत की नाही?
अजूनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या
आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. रोजच्या प्रवासात, सामाजीक आयुष्यात अनेक प्रकारचे
लैंगीक, मानिसक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणार्‍या महिलांसाठी आपण आता तरी सेफ
झोन तया करणार आहोत की नाही?
दिल्लीच्या निभर्यापासून ते भंडारा जिल्ह्यातील तीन चीमुकल्या बहिणींवर बलात्कारच्या घटना मिडीयातधून येत असताना या
महिलादिनाची उपयुक्तता आणि यशिस्वता यावरच प्रश्निचन्ह नाही का उभे राहत?
देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तीला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या
प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना या हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी मदत करायला नको का?
सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रीयांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगीक शोषणाची समस्या
अजूनही तेवढीत बीकट आहे. बहुसंख्य वेळा मानसीक त्रासाला कंटाळून स्त्रीयांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी गुन्हेगार
तसेच मोकाट फीरत असतात. असे हजारो प्रश्न आहेत. त्यांचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रीयांचे आयुष्य सुखकर
होण्याकिरता आपण काही विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत?
niyati foundation logo

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.