बेळगाव दि ४ : विकास काम आणि निधी वाटपात दक्षिण उत्तर असा भेदभाव करू नये कोणताही नगरसेवक काम घेऊन आल्यास त्यांची त्वरित काम करा अन्यथा कारवाई करू असा इशारा पालिका अधिकाऱ्यांना पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विकास आढावा बैठकीत दिला . शनिवारी दुपारी महा पालिका सभागृहात नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची विकास आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या समस्या ऐकून घेतल्या नंतर ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी महापौर संज्योत बांदेकर होत्या तर आमदार संभाजी पाटील आयुक्त शशिधर कुरेर उपमहापौर नागेश मंडोळकर उपस्थित होते.
महापौर निवडणुकीत बरंच राजकारण झालंय, पालिका बरखास्त व्हायची मी वाचवली आहे त्यामुळे सर्व नगरसेवकांनी भाषा भेद आपापसातील मतभेद बाजूंल सारून विकास काम करावी शिवाय नगरसेवकांच्या अधिकाराबाबत आणि विकास कामा बाबत अगोदर जे झालय ते इथून पुढ होणार नाही यापुढे नवीन अध्याय सुरु करूया असा अस म्हणत महा पालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवका वर बोगस कागद पत्र करून जमीन हडपण्याच्या केस झालेतया प्रकरणी नगर सेवकांना टार्गेट केल जातंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा असा आदेश देखील यावेळी जारकीहोळी यांनी दिला .
वार्ड प्रमाणे समस्या ऐकून घ्या
एकाच बैठकीत सर्व नगरसेवकांच्या समस्या ऐकता येणार नाही किंवा समाधान करता येणार नाही त्यामुळे आयुक्तांनी दररोज पाच नगरसेवकांच्या समस्या ऐकून घ्या त्यावर मग चर्चा करू तोडगा काढू अस ही यावेळी जारकीहोळी म्हणाले . यावेळी महापौर संज्योत बांदेकर यांनी पालिकेस अतिरिक्त अनुदान ध्याव अशी मागणीच निवेदन दिल.