बेळगाव दि 14-राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी मोदगा येथील एकास मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. मिरसाब यरगट्टी असे त्याचे नाव आहे.
त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. काही पाकिस्तानी व्यक्तींनी सोशल मीडियावर पसरविलेल्या राष्ट्रध्वज संदर्भातील अवमानकारक मजकूर आणि छायाचित्रांचे प्रसारण केल्याचा आरोप त्याच्यावर असून पुढील तपास सुरू आहे.