बेळगाव शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ करणाऱ्या बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी आज पुन्हा विकास मोहीम सुरू ठेवली. गेल्या आठवड्यात ,समर्थनगर तानाजी गल्ली, तांगडी गल्ली,डी सी कोर्ट आवार आदी परिसरात कोट्यावधी निधींची विकास कामे सुरू केली आहेत.
शहरातील कोनवाळ गल्लीत आज 36 लाख रुपये खर्चून पेव्हर्स व गटारची कामे हाती घेण्यात आली आहेत, रेडिओ कॉम्प्लेक्सजवळील गटाराच्या कामांसाठी २१ लाख रुपये, रामलिंगखिंड गल्ली येथील रस्त्याच्या कामासाठी ३१ लाख रुपये, अनसुरकर गल्ली येथील रस्ते व गटार कामांसाठी १६ लाख रुपये, केळकर बाग येथील रस्त्याच्या कामांसाठी ५६ लाख रुपये एकूण रु. 3.90 कोटी खर्चाच्या कामांचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले, आमच्या मतदारसंघात आज आम्ही रस्ता, गटार, पेव्हरचे काम सुरू केले असून, एकूण 3.90 कोटी रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात झाली आहे. काम पाहण्यासाठी लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे कामे दर्जेदार होतील. आगामी काळातही आमचा विकास सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर, जयतीर्थ सौंदत्ती, अभिजीत सुनगार, बाळू मासनकर, रामा शिंदोळकर, शशिकांत शिरोळ, अशोक थोरात निखिल नरसगौडा, प्रदीप किल्लेकर, सुभाष हंडे, गुरुराज आचार्य, प्रसाद लेंगडे, नितीन कोल्हापुरे, निर्मला काळे, चंद्रकला सौरब, अनिकेत दासानी, परेश शिंदे आदी उपस्थित होते.