अश्लील सी डी प्रकरणामुळे राजीनामा द्यायला लागलेले माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जार की होळी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.शनिवारी गोकाक येथे त्यांनी गोकाक तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
गोकाक तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. कोरोना रुग्णावर उपचार करणेसाठी आवश्यक ती औषधे आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही याची खबरदारी घ्या असेही रमेश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
कर्नाटकात ऑक्सिजनचा तुटवडा असून त्या संबंधी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मा ई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून लवकरच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार आहे.गावातील लोकांनी शहरात जावू नये शहरातील लोकांनी गावात येवू नये.
कोणीही लॉक डाऊन कालावधीत घराबाहेर पडू नये.घरातच प्राणायाम,योगासने करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोना बाबत लोकांनी घाबरु नये.
काही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांची भेट घेवून उपचार घ्यावेत असे आवाहनही रमेश जारकीहोळी यांनी केले.