बेळगावात आर टी पी सी आर टेस्ट करण्यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे.
आर टी पी सी आर टेस्ट साठी स्व्याबचे नमुने देखील मोठ्या संख्येने येत आहेत.त्यामुळे कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची फक्त आर टी पी सी आर टेस्ट केली जाणार आहे.
बेळगावात दररोज साडे तीन ते चार हजार स्व्याब गोळा केले जातात.सरकारी प्रयोगशाळेत नमुने पाठवल्या नंतर त्याचा रिपोर्ट येण्यास चार ते आठ दिवस लागत आहेत.तर खासगी हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेतून चोवीस ते छत्तीस तासात रिपोर्ट येतो.सरकारी प्रयोगशाळेतील रिपोर्ट उशिरा येत असल्याने समस्या उदभवत आहेत.
मुख्यमंत्री येडीयूराप्पा यांच्या संपर्कात आलेल्या बारा व्यक्तींचे रिपोर्ट येण्यास अठरा दिवस लागले.त्यामुळे प्रयोगशाळांमध्ये येत असलेला ताण कमी करण्यासाठी केवळ लक्षणे असलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या आर टी पी सी आर टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.