कोरोना आला आणि सारे जग संकटात सापडले आहे. आपला भारत देश दुसऱ्या लाटेत अतिशय मेटाकुटीला आला आहे. आपले कर्नाटक राज्य आणि बेळगाव जिल्हा वाढत्या कोरोना प्रकरणांनी आणि मृत्यूंनी भयचकित झाला आहे. ऑक्सिजन बेड तर सोडाच इस्पितळात साडे बेडही मिळत नाहीत हे वास्तव असून लवकरात लवकर ही भीती दूर होण्याची गरज आहे.
मागच्या वर्षीचा लॉक डाऊन संपल्यानंतर खरेदीसाठी झालेली गर्दी आणि निवडणूका हीच प्रमुख कारणे कोरोनाच्या अधिक प्रसाराला महत्वाची ठरली आहेत. रोग पसरत होता आणि आम्हाला त्याचे भान नव्हते असेच घडले आणि आता घरोघरी आणि गल्लोगल्ली रुग्ण दिसून येत आहेत.
हे चित्र भयानक असून ते वेळीच रोखले गेले नाही तर पुढील काळात परिस्थिती भयानक होऊ शकते असा अंदाज आहे.
लसीचा अभाव हे एक प्रमुख कारण नागरिकांना भयभीत करीन सोडत आहे. कर्नाटकाला को व्हाक्सीन चा साठा अपुरा मिळाला आहे.
कोविशील्ड आहे पण म्हणावे तितके नाही. यामुळे आता सरकारने फक्त पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला असून ती प्रक्रियाही कूर्मगतीने सुरू आहे.
कोरोनाला घालवायचे असेल तर शक्य तितके घरीच राहून आपण त्याचा बिमोड करू शकतो. यासाठी घरीच राहा आणि सुरक्षित राहा हेच महत्वाचे आहे.