बेळगाव जिल्ह्यात गेल्या 1 मेपासून मंगळवार दि. 18 मेपर्यंतच्या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट 47.22 टक्के आणि रिकवरी रेट 39.45 टक्के इतका होता.
जिल्ह्यात गेल्या 1 मेपासून मंगळवार दि. 18 मेपर्यंतच्या अठरा दिवसांच्या कालावधीत तब्बल 18,192 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
त्याप्रमाणे या कालावधीत उपचारांती पूर्णपणे कोराना मुक्त झालेल्या 6,038 रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.