रेणुका मंदिराचा प्रसाद आता बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घरी पोहोचणार आहे.बेळगाव जिल्ह्यातील काहीं मंदिरे नामांकित आणि सर्वदूर प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक सौन्दत्ती येथील रेणुका देवीचे मंदिर होय.
या मंदिराची कमाई लाखोंच्या घरात जाते या मंदिरा मार्फत अनेक भक्ती उपयोगी उपक्रम राबवले जातात यावेळी मात्र मंदिर ट्रष्टच्या वतीनं सामाजिक भान राखत बेळगाव जिल्ह्यातील छोट्या मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या आर्थिक ओढतानाचा विचार करून त्यांना मदत होईल या दृष्टिकोनातून अन्न धान्य रेशन देण्यात येणार आहेत.
कोरोना संक्रमण काळात सौंदत्ती येथील श्री यल्लामा देवस्थान ट्रस्टने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.यल्लम्मा देवस्थान ट्रस्ट तर्फे बेळगाव जिल्ह्यातील क वर्गातील मंदिरांच्या पुजाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या ट्रस्टला मदत करण्या संबंधी सूचना केलीआहे त्यानुसार जिल्ह्यातील 600 मंदिर पुजाऱ्यांना हे किट देण्यात येणार आहेत.
बेळगावातील १५०,बैलहोंगल १५०,गोकाक १००, सौन्दत्ती १००, मुडलगी ५०, कित्तुर ५० अशी एकूण सहाशे रेशन किट मंदिरांच्या पुजाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत.बेळगाव जिल्ह्यातील शीर्षस्थानी असणाऱ्या रेणुका देवी मंदिराने जिल्ह्यातील लहान मंदिरांच्या 600 रेशन किट देत यल्लममा सर्वांची अम्मा (आई)ठरत आहे.