18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 8, 2021

बेकायदेशीर कृषी साधने विकणाऱ्या दुकानावर धाड

बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथे विना परवाना कृषी साधने विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी खात्याच्या दक्षता विभागाने धाड टाकली आहे. सौन्दत्ती तालुक्यातील अक्कीसागर गावात श्री अंजनेय ऍग्रो सेन्टर धाड टाकुन कारवाई केलेल्या दुकानाचे नाव आहे.या दुकानावर धाड टाकून कृषी साधन जप्त करत...

मंगळवारी बेळगाव पोलिसांनी केली ही कारवाई-इतके पोजिटिव्ह रुग्ण

लॉकडाऊनचे  उल्लंघन केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी बेक्कीनकेरे येथील सैराट धाब्यावर धाड टाकत 40 लिटर दारू जप्त करत दोघाना अटक केली. सोमनाथ भरमा पाटील वय 34 रा.अतवाड बेळगाव. भाऊ सातेरी खनगावकर वय 24  रा. कुद्रेमानी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.या प्रकरणी...

…अन् देवदूत बनून आली शिवसेनेची रुग्णवाहिका

जन्मताच छातीत छिद्र असल्यामुळे तातडीने शस्त्रक्रियेची गरज असलेल्या एका बालकाचा जीव वाचवण्यासाठी शिवसेनेची रुग्णवाहिका देवदूत बनून आली आणि तिने 500 कि. मी.चे अंतर पार करत त्या बालकाला बेळगावहून मुंबईला सुखरूप नेऊन उपचार उपलब्ध करून दिले. याबाबतची माहिती अशी की, कॅम्प...

शनिवारी रविवारी संपूर्ण लॉकडाऊन

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी येत्या शनिवार दि. 12 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 14 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाऊन घोषित केला...

दहावी, बारावी उत्तीर्णांना आरोग्य खात्यात भरतीची संधी

राज्याच्या आरोग्य खात्यात लवकरच मेगा भरती करण्यात येणार असून त्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण युवक-युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे मंत्री सुधाकर यांनी नुकतीच दिली आहे. परिणामी अनेकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील...

बालू फोर्ज उभारणार 200 कोटीचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस

बेळगावमध्ये 200 कोटी रुपये खर्चाचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस उभारण्यासाठी आपला कर्नाटक सरकारची सामंजस्य करार झाला असल्याची माहिती बालू फोर्ज इंडस्ट्रीजने आज मंगळवारी दिली. आमचा कर्नाटक सरकारशी सामंजस्य करार झाला असून त्यानुसार बेळगावातील 25 एकर जागेमध्ये कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पसची उभारणी केली जाणार...

कर्नाटकात सी ई टी परीक्षेची ठरली तारीख

अभियांत्रिकी शिक्षणासह विविध व्यावसायिक अभ्यास क्रमासाठी कर्नाटक कॉमन इन्ट्रन्स टेस्ट(सीईटी) परीक्षा आगामी 28 आणि 29 आगष्ट रोजी घेतली जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री, कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एन अश्वथनारायण यांनी दिली. 28 व 29 आगष्ट रोजी होणाऱ्या सी ई...

युनिव्हर्सल ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

पावसाळ्यात सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे खडेबाजार पोलिसांना रेन सुटचे वितरण करण्यात आले. आपल्या विविध उत्पादनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या युनिव्हर्सल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना रेन सूटचे वितरण केले. सध्या...

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी 500 निवारा केंद्रे

मान्सून लवकरच सक्रिय होण्याचे संकेत असल्यामुळे संभाव्य अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 500 निवारा केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्ती बाबत आदेश जारी करण्यात...

बेड्सची मागणी घटल्यामुळे ऑक्सिजन सपोर्ट सेंटर बंद

कोरोना बाधितांना आता हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होत आहेत, शिवाय बेळगाव शहरात ऑक्सिजनची मागणी देखील कमी झाल्यामुळे महापालिकेने स्पोर्ट्स हॉस्टेलमधील ऑक्सिजन सपोर्ट सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे. गेल्या मे...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !