18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 12, 2021

*रुग्णांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद*

कुमारस्वामी ले आऊट मधील कोविड केंद्रातून कोरोनाशी लढून बरे झालेल्या सात व्यक्तींना जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी फुलांची रोपे देवून कोविड केंद्रातून घरी जाताना शुभेच्छा दिल्या. कोविड रुग्णांना सरकारच्या मार्गदर्शक सुचीनुसार उपचार करून उत्तम आहार त्यांना केंद्रात देण्यात येत होता.रुग्णांना केंद्रामध्ये उत्तम...

कोरोनामुळे क्रीडा प्रशिक्षकांच्या पाया खालची जमीन अस्थिर

कोरोनाने अनेकांना बेरोजगार करण्याबरोबरच क्रीडापटूंचा क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीलाही मोठी बाधा पोहोचविली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्व सुविधा बंद झाल्याने क्रीडा क्षेत्रावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या प्रशिक्षकांना आपले भविष्य ऊदास दिसू लागले आहे. राज्यात बेंगलोरनंतर सर्वाधिक इनडोअर आणि आउटडोअर स्पोर्ट्स अकॅडमीस असणारे...

पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारा ठाणेदार!

बेळगावातील सर्वाधिक दबदबा असणारे पोलीस ठाणे म्हणजे मार्केट पोलीस ठाणे होय. सदर पोलीस ठाण्याने फेब्रुवारीमध्ये 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या सुवर्ण महोत्सवानिमित्त मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी आपल्या ठाण्याला आकर्षक स्वरूपासह एक नवा लुक दिला आहे. सुवर्ण...

21 पर्यंतच्या वाढीव लाॅक डाऊनमध्ये काय आहे नवे?

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कोरोनासंदर्भातील सध्याचा लाॅक डाऊन 11 जिल्ह्यांमध्ये 21 जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगून 14 जूनपासून उर्वरित जिल्ह्यामधील लाॅक डाऊन शिथिल केला जाईल, असे गुरुवारी स्पष्ट केले आहे. राज्यातील ज्या 11 जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे,...

शहरात ‘या’ ठिकाणी कांही काळ उडाला लसीकरणाचा फज्जा

कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लस घेण्यासाठी रितसर रांगेत उभारलेल्या नागरिकांना डावलून वैद्यकीय कर्मचारी आपल्या नातलग व परिचयातील लोकांना इंजेक्शन देत असल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे कांही काळ लसीकरणाचा फज्जा उडाल्याची घटना आज सकाळी भांदुर गल्ली येथे घडली. याबाबतची अधिक...

युवा शेतकरी ‘फुलवतो’ आहे मुंबईची बाजारपेठ

कोरोना प्रादुर्भावासह लॉक डाऊनच्या परिस्थितीसमोर एकीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी हार मानली असताना दुसरीकडे एका युवा शेतकऱ्याने या प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करताना मुंबईमधून मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त करून घेतला आहे. बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी येथील आकाश काशेट्टी या युवा शेतकऱ्याने आपल्या दोन...

पोलीस दलाचा ‘रॅम्बो’ हरपला : ज्येष्ठ कर्तव्यदक्ष श्वानाचे निधन

अनेक गुन्हेगारी प्रकरणांमधील तपासात पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाचे धागेदोरे मिळवून देऊन गुन्हेगारांपर्यंत पोचविण्यास मदत करणाऱ्या 'रॅम्बो' या कर्तव्यदक्ष व राज्यातील ज्येष्ठ पोलीस श्वानाचे आज निधन झाले. पोलीस दलातर्फे रेम्बोला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन, उपायुक्त...

उद्यानांमधील अतिक्रमणांचे महापालिकेकडून सर्वेक्षण

बेळगाव महापालिकेच्या बांधकाम आणि महसूल विभागाकडून संयुक्तरीत्या शहरातील उद्याने तसेच उद्यानासाठी राखीव जागेतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली बजावलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून बेळगाव दक्षिण व उत्तर विभागात एकाच वेळी...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !