18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 1, 2021

बेळगावातील या मार्गावर आता इतर वाहतूक बंद

बेळगाव शहरापासून बाहेर जाणारा आणि बिम्स हॉस्पिटल ला जोडणारा डॉ आंबेडकर मार्ग आता फक्त वैद्यकीय कारणासाठी सुरू राहणार आहे. बुधवारी पहाटे ५ पासून अशी अंमलबजावणी होणार असून बेळगावचे पोलीस आयुक्त  त्यागराजन यांनी हा निर्णय घेतला आहे. या मार्गावरून अंबुलन्स ,डॉक्टर आणि...

अनलॉक प्रक्रियेला सात जून पासून सुरू व्हायची शक्यता-

कर्नाटकात अन लॉक प्रक्रियेला सात जून पासून निश्चित सुरुवात होईल असे कर्नाटकचे उप मुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांनी बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. लॉक डाऊन चे निर्बंध एकदम उठवले जाणार नाहीत. निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवले जातील . लॉक डाऊन चे निर्बंध कशा पद्धतीने...

जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे 87 रुग्ण :

गेल्या दोन दिवसात बेळगाव जिल्ह्यामध्ये ब्लॅक फंगसचे नव्याने 17 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या एकूण 87 झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही मुलांमध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ...

एम्सची शाखा तात्काळ सुरू करा : पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बेळगावमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली असून वैद्यकीय सुविधांचा अभाव निर्माण होऊन रूग्णांचे हाल होत असल्यामुळे बेळगावमध्ये एम्स अर्थात ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची शाखा त्वरित सुरू करावी, अशी मागणी बेळगावच्या विनय नाथाजी चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केली...

पोलिसांकडून कठोर पावले; कारवाईचा बडगा

कोरोना नियंत्रणात येण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरू नका असे पोलिस प्रशासनाने सातत्याने सांगितले तरी नागरिक मात्र त्याकडे पूर्ण कानाडोळा करत आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. लाॅक डाऊन काळात सरकारने अत्यावश्यक सेवांना मुभा...

आता 4 ते 6 जून संपूर्ण लॉक डाऊन!

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेऊन संपूर्ण लॉक डाऊनचा (विकेंड लॉक डाऊन) कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवार 4 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी 7 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संपूर्ण लॉक...

*सेन्ट्रल हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांची कोरोना वारीयरला मदत*

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्वतःच्या जीव धोक्यात घालून समाजासाठी झटणारे कोरोना वारीयर सुरेंद्र अनगोळकर यांना आर्थिक मदत देत सेंट्रल स्कुलच्या माजी विध्यार्थ्यांनी सत्कार केला. गेल्या दोन महिन्याच्या काळात हेल्प फॉर नीडी या संघटनेच्या माध्यमातून सुरेंद्र यांनी शेकडो मृतदेहावर अंतिम संस्कार केलाय...

कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

1 जून 1986 च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीसह शिवसेना व अन्य संघटनांच्यावतीने आज मंगळवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज मंगळवारी सकाळी या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !