18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 2, 2021

तीन दिवस बँका बंद ए टी एम सुरू

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस शहरासह जिल्ह्यात कडक लाॅक डाऊन असला तरी या काळात बँका जरी बंद असल्या तरी एटीएम मात्र सुरू राहणार असल्याची माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी प्रसिद्धीस दिली आहे. जिल्ह्यातील नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील...

कांही सवलतीसह 7 जूननंतरही कडक लाॅक डाऊनचे संकेत

कोरोना प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणाखाली आलेला नाही. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढतच आहे. तथापि ठराविक क्षेत्रांना थोडी मोकळीक देता येईल, अशी माहिती देण्याद्वारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 7 जूननंतरही राज्यात लॉक डाऊन जारी राहण्याचे संकेत आज दिले. बेंगलोर येथे...

चीनी भात बियाणाबाबत धोक्याचा इशारा

कोरोना विषाणू प्रमाणे चीनमधून भारतामध्ये अतिशय धोकादायक अशा उभे पीक नष्ट करणाऱ्या भात बियाणाची आयात होत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही बियाणे कोणत्याही परिस्थितीत खरेदी करू नयेत, असे आवाहन बेळगाव जिल्ह्याचे मुख्य कृषी संचालक शिवानंद एस. पाटील यांनी केले आहे. भारतासह...

मनपा कर्मचाऱ्यांची लाॅक डाऊनसंदर्भात जनजागृती

कोरोना प्रादुर्भावाला थोपविण्यासाठी सरकारने येत्या शुक्रवारपासून लागू केलेल्या सलग तीन दिवसांच्या कडक लाॅक डाऊनसंदर्भात मनपा आयुक्तांच्या आदेशावरून आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वार्ड क्र. 20 आणि 21 मध्ये जनजागृती मोहीम राबविली. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक संजय...

कोरोनामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी वलय कचेऱ्यांची सोय

बेळगाव महानगरपालिका व्याप्तीतील मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर महापालिकेने निश्चित केलेल्या वलय कचेरीमध्ये भरून पावती घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे. कर्नाटक राज्यासह बेळगाव महानगरपालिका व्याप्तीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही प्रतिकूल...

बिम्स संचालक धास्तीकोप्प दीर्घ रजेवर

बेळगाव शहरातील बीम्स (सिव्हिल) हॉस्पिटलला मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच भेट देऊन तेथील कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा लवकरच बीम्सला भेट देण्यास येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चेला...

कठोर लाॅक डाऊन कायम ठेवा : ‘टीएसी’ची सरकारला शिफारस

कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीचे तपशीलवार पृथक्करण केल्यानंतर कोरोनावरील राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) येत्या 7 जूननंतर देखील लाॅक डाऊनची कठोर अंमलबजावणी कायम ठेवावी, अशी शिफारस सरकारकडे केली आहे. राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीच्या रविवारी झालेल्या 107 व्या बैठकीमध्ये सदर शिफारशीचा...

प्रभाग पुनर्रचना दावा : सुनावणी पुन्हा लांबणीवर

बेळगाव महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात न्यायालयासमोर आज बुधवारी 2 जून रोजी होणारी सुनावणी आणखी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती खटल्यातील वादी माजी उपमहापौर...

खर्च कपातीसाठी सुवर्ण सौधवर बसविणार सोलर पॅनल

शहरानजीकची सुवर्ण विधानसौधची इमारत म्हणजे 'पांढरा हत्ती' झाला असून या इमारतीचा उपयोग कमी आणि देखभालीचा खर्च अधिक होत आहे. या खर्चामध्ये कपात करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुवर्ण सौध इमारतीवर सोलार...

शहापूर मुक्तीधामात महिन्याभरात तब्बल 340 अंत्यसंस्कार

बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये अद्यापही कोरोनाग्रस्तांसह मृतांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या मे महिन्यात शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीमध्ये तब्बल 340 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यापैकी 149 मृतदेह कोरोना बाधित होते. शहर आणि उपनगरांमध्ये अद्यापही कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !