Thursday, April 25, 2024

/

का बिम्स अधिकारी झालेत खडबडून जागे?

 belgaum

बिम्स रुग्णालयाच्या विशेष अधिकारीपदी प्रादेशिक आयुक्त आम्लन आदित्य विश्वास यांची नियुक्ती केल्यावर तेथील कारभारात सुधारणा निश्चित होणार असल्याचे दिसत आहे.ते एक कडक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर
बिम्स मध्ये सेवा बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी आता खडबडून जागे झाले आहेत.

विश्वास हे सोमवारी बिम्सला भेट देणार आहेत.त्यापूर्वी तेथील डॉकटर आणि अधिकारी वर्गाची रविवारीचं लगबग सुरू झाली आहे.

रविवारी बिमसचे प्रभारी संचालक डॉ.उमेश कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ.गिरीश दंड गी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुधाकर,डॉ.केशव आणि डॉ. इरण्णा पल्लेद यांनी पी पी ई किट घालून कोरोना वार्डची पाहणी केली.प्रशासकीय अधिकारी एस.एस. बळारी यांनी लसीकरण केंद्र आणि कंट्रोल रुमला भेट देऊन पाहणी केली .Bims officials

 belgaum

जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस.येडीयूरप्पा यांना खास बेळगावला यावे लागले.बेळगावात आल्यावर बैठक झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ आय ए एस अधिकारी आणि बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आम्लन आदित्य विश्वास यांची बिम्स अर्थात जिल्हा रुग्णालयाचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

त्यांची नियुक्ती झाल्यावर बिमस मधील कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून सगळे अंगावरची धूळ झटकून कामाला लागले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.