belgaum

10 दिवसांची सीआयडी कोठडी

0
461
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावातील बहुकोटी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या शिवानंद नीलण्णवर याला न्यायालयाने १० दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयात न्यायाधीश आणि आरोपी यांच्यात महत्त्वपूर्ण संवाद घडला. आरोपीला पुढील चौकशीसाठी बंगळुरू येथे हलविण्यात येत आहे.


बेळगाव येथील द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी हा आदेश दिला. सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची तब्बल एक हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, राज्यासह इतर राज्यांत जाऊन तपास करण्याची गरज असल्याने सीआयडीने कोठडीची मागणी केली होती.

 belgaum


सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःला मधुमेह व हृदयविकाराचा त्रास असल्याचे सांगितले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.


यावेळी आरोपीने “३५ हजार लोकांना पैसे नकोत, त्यांना मी हवा आहे,” असे म्हटल्यावर न्यायाधीशांनी त्याला फटकारले. “निरपराध लोकांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अनेक जण पैसे घेऊन पळून गेले आहेत. इतिहासातून धडा शिकण्यासाठीच हा कायदा करण्यात आला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः’,” असे सांगत न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले.


दरम्यान, न्यायालयातून बाहेर पडताना भावाला पाहून शिवानंद नीलण्णवर भावूक झाल्याचे दिसून आले.
सीआयडीचे डीजीपी भीमाशंकर गुलेद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्राथमिक तपास पूर्ण केला असून, माळमारुती पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन आरोपीला आजच बंगळुरूला नेण्यात येणार आहे.


आरोपीच्या वकिलांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याची तयारी असल्याचा दावा केला असला तरी न्यायालयाने तो युक्तिवाद सध्या ऐकण्यास नकार दिला.
आरोपीचे वकील मंजुनाथ जी. एल. यांनी माध्यमांना सांगितले की, “हा केवळ आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांच्या तांत्रिक उल्लंघनासंदर्भातील स्वयंप्रेरित गुन्हा आहे. कोणत्याही ग्राहकाने तक्रार दिलेली नाही. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत. जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.”

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.