belgaum

गोव्यात बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीचा जलवा; 14 वर्षांखालील स्पर्धेत विजेतेपद

0
110
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोव्यातील कलिंगड येथे बडोदा फुटबॉल अकादमी, गुजरात यांच्या वतीने आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत झालेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकाविले.

अंतिम सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने सोलापूरच्या समर्थ क्रीडा फुटबॉल क्लबचा 4-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. विजयी संघाकडून हुजेफा अथणी, हुसेन जमादार, अनिकेत पाटील आणि फौजन शेख यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत मानस फुटबॉल अकादमीने एमबीबीएस गोवा क्लबचा 4-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. त्या सामन्यात हुसेन जमादार, हुजेफा अथणी, फैजान शेख आणि प्रणव पिल्ले यांनी प्रत्येकी एक गोल केला.

विजेत्या मानस फुटबॉल अकादमी संघात अनिकेत पाटील, हुसेन जमादार, हुजेफा अथणी, प्रणव पिल्ले, अमोघ तलवार, आर्या कंग्राळकर, मानव शिंदे, फौजन शेख आदी खेळाडूंचा समावेश होता.

 belgaum

संघाला प्रशिक्षक मानस नायक आणि रवी मालशेट यांचे मार्गदर्शन लाभले असून पालक वर्गाकडूनही खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळत आहे.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा बडोदा फुटबॉल अकादमीचे संचालक संदीप देसाई यांच्या हस्ते विजेत्या मानस फुटबॉल अकादमी संघाला आकर्षक चषक, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.