बेळगाव महानगरपालिका व्याप्तीतील मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर महापालिकेने निश्चित केलेल्या वलय कचेरीमध्ये भरून पावती घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे.
कर्नाटक राज्यासह बेळगाव महानगरपालिका व्याप्तीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन मालमत्ता कर भरण्यासाठी असणारे बेळगाव -वन केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. तेंव्हा महापालिका व्याप्तीतील मालमत्ताधारकांनी स्वतः सोबत मोबाईल आणि एटीएम कार्ड घेऊन जाऊन संबंधित वलय कचेरीमध्ये मालमत्ता कर भरून पावती घ्यावी, असे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्र. 1 ते 7 मधील मालमत्ताधारकांनी शहापूर गोवावेस सर्कल येथील व्यापारी संकुलातील पालिकेच्या वलय कचेरीमध्ये आपला मालमत्ता कर भरावा. तसेच अधिक माहितीसाठी 9845891518 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. त्याप्रमाणे प्रभाग क्र. 8 ते 14 मधील मालमत्ताधारकांनी देखील याच व्यापारी संकुलामध्ये कर भरून पावती घ्यावी. या प्रभागातील नागरिकांनी अधिक माहितीसाठी 9900775501 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. प्रभाग क्र. 15 ते 20 मधील मालमत्ताधारकांनी देखील गोवावेस व्यापारी संकुल यामध्येच आपला मालमत्ता कर भरावा आणि अधिक माहितीसाठी त्यांनी 8970608009 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच प्रभाग क्र. 21 ते 26 मधील नागरिकांनीही गोवावेस व्यापारी संकुलाच्या ठिकाणीच मालमत्ता कर भरावा. या प्रभागांमधील नागरिकांनी अधिक माहितीसाठी 9686799275 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले.
उर्वरित प्रभागांपैकी प्रभाग क्र. 27 ते 32 मधील मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर रिसालदार गल्ली येथील महापालिकेच्या जुन्या कार्यालयाच्या ठिकाणी भरावा. त्यांनी अधिक माहितीसाठी 8050133461 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. प्रभाग क्र. 36 ते 39 मधील नागरिकांनी आपला मालमत्ता कर कोनवाळ गल्ली येथील महापालिकेच्या गेस्ट हाऊसमध्ये भरणा करावा. तसेच अधिक माहितीसाठी 9731867888 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. त्याच प्रमाणे प्रभाग क्र. 40 ते 45 मधील मालमत्ताधारकांनी देखील कोनवाळ गल्ली येथील महापालिका गेस्ट हाऊसमध्येच मालमत्ता कर भरावा आणि आवश्यकता भासल्यास 8147855514 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रभाग क्र. 46 ते 52 मधील नागरिकांनी आपला मालमत्ता कर अशोकनगर येथील ईएसआय होस्टेल शेजारील पालिकेच्या वलय कचेरीमध्ये भरावा. तसेच अधिक माहितीसाठी 9731062872 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 53 ते 58 मधील मालमत्ताधारकांनी देखील अशो नगर येथील ईएसआय होस्टेल शेजारील कचेरीत कर भरावा आणि आवश्यकता भासल्यास 9902686126 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे. याव्यतिरिक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे मालमत्ताधारक आपला मालमत्ता कर महापालिकेकडे भरू शकतात, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.